आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रतिपादन ‎:नवीन शैक्षणिक धोरण‎ उज्वल भविष्याची नांदी‎

माजलगाव‎22 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवीन शैक्षणिक धोरणात विद्यार्थी‎ हिताचा विचार करण्यात आलेला‎ आहे. ही विद्यार्थ्यांच्या उज्वल‎ भविष्याची नांदी असल्याचे‎ प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे‎ पश्चिम क्षेत्र सेवा प्रमुख उपेंद्र‎ कुलकर्णी यांनी केले.‎ सिद्धेश्वर महाविद्यालयात‎ आयक्यूएसी विभागाच्या वतीने‎ आयोजित शिक्षक उद्बोधन वर्गात‎ प्रमुख मार्गदर्शक म्हणून ते बोलत‎ होते. यावेळी भा.शि.प्र.संस्था‎ अंबाजोगाईचे केंद्रीय कार्यकारणी‎ सदस्य प्रवीण सरदेशमुख, केंद्रीय‎ कार्यकारिणी सदस्य प्रकाश दुगड,‎ स्थानिक प्रशासन समितीचे‎ कार्यवाह विष्णुपंत कुलकर्णी,‎ महाविद्यालय विकास समितीचे‎ अध्यक्ष अभय कोकड, प्राचार्य प्रो.‎ सुहास मोराळे उपस्थित होते.‎ पुढे बोलताना उपेंद्र कुलकर्णी‎ म्हणाले की नवीन शैक्षणिक‎ धोरणाची अंमलबजावणी केंद्र‎ सरकारने देशभर प्रभावीपणे सुरू‎ केली आहे.

या शैक्षणिक धरणांमध्ये‎ विद्यार्थी केंद्रभूत माणून विद्यार्थ्यांच्या‎ सर्वांगीण विकासासाठी केंद्रभूत‎ असा अभ्यासक्रम तयार केला गेला‎ आहे. मग यातून भविष्यात पदवी‎ घेऊन बाहेर पडणारे विद्यार्थी हे‎ वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये आपली‎ चमक दाखवतील तसेच देशाच्या‎ शैक्षणिक विकासात त्यांचा‎ महत्त्वाचा वाटा असेल. प्रास्ताविक‎ महाविद्यालयाचे प्राचार्य प्रो. सुहास‎ मोराळे यांनी केले. सूत्रसंचालन‎ उपप्राचार्य डॉ. युवराज मुळये यांनी‎ तर आभार उपप्राचार्य डॉ. गजानन‎ होन्ना यांनी मानले. या कार्यक्रमास‎ आय.क्यु.ए.सी. विभागाचे‎ समन्वयक डॉ. विनायक देशमुख‎ तसेच वरिष्ठ महाविद्यालयातील‎ सर्व प्राध्यापक- प्राध्यापिका यांची‎ उपस्थिती होती.‎

बातम्या आणखी आहेत...