आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पब्लिक स्कूल:गेवराई तालुकास्तरीय विज्ञान मेळाव्यात न्यू इरा पब्लिक स्कूलची बाजी

गेवराई3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

तालुका स्तरीय विज्ञान प्रदर्शन, विज्ञान मेळावा व विज्ञान नाटिका या तिन्ही स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवून न्यू इरा पब्लिक स्कूलने बाजी मारली. गेवराई गट साधन केंद्राच्या वतीने तालुका स्तरीय विज्ञान मेळावा, विज्ञान प्रदर्शन व नाट्य महोत्सवाचे आयोजन २९ व ३० ऑगस्ट रोजी जिल्हा परिषद माध्यमिक शाळेत करण्यात आले होते.

इरा पब्लिक स्कूलच्या श्रावणी क्षीरसागर व विपुल काला यांच्या प्रयोगाला प्रथम क्रमांक मिळाला. वकृत्व स्पर्धेत प्राथमिक गटात न्यू इरा पब्लिक स्कूलच्या उम्मे हानी तुराब अत्तार हिचा प्रथम क्रमांक आला. यासह नाट्य स्पर्धेत माध्यमिक गटात न्यू इरा पब्लिक स्कूलचा प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण ठरला.

बातम्या आणखी आहेत...