आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराऔरंगाबाद परिक्षेत्रांतर्गत येणाऱ्या जिल्ह्यातील पोलीस अधिकाऱ्यांच्या बदली प्रक्रियेला १४ डिसेंबरपासून सुरुवात झाली. विशेष पोलीस महानिरीक्षक के.एम.मलिकार्जुन प्रसन्ना यांनी पीआय, एपीआय आणि पीएसआय यांचे बदली आदेश जारी केले जिल्हा पोलीस दलातील पोलीस निरीक्षकांची जिल्ह्याबाहेर बदली झाली आहे.
बीड जिल्हा पोलीस दलातील पोलीस निरीक्षक तथा सायबर सेलचे पोलिस निरीक्षक रवींद्र गायकवाड यांची उस्मानाबाद येथे प्रशासकीय बदली झाली आहे. याबरोबरच पोलिस निरीक्षक शेषेराव उदार यांची औरंगाबाद ग्रामीण तर जिल्हा वाहतुक शाखेचे पोलिस निरीक्षक भागवत फुंदे यांची जालना येथे बदली झाली आहे. यापूर्वी बीड ग्रामीण ठाण्याचे प्रमुख म्हणून काम पाहिलेले शितलकुमार बल्लाळ यांची जालना येथून पुन्हा एकदा बीड येथे बदली झाली आहे. याशिवाय पोलीस निरीक्षक बालक कोळी यांची औरंगाबाद ग्रामीण येथून बीड पोलीस दलात बदली झाली आहे.
स्थानिक गुन्हे शाखेत कार्यरत सहायक निरीक्षक ज्ञानेश्वर कुकलारे व आर्थिक गुन्हे शाखेतील प्रमोद भिंगारे यांची औरंगाबाद ग्रामीण येथे विनंती बदली झाली आहे. बीड पोलीस दलातील सपोनि.लक्ष्मण केंद्रे यांची औरंगाबाद ग्रामीण येथे प्रशासकीय बदली झाली आहे.
उपनिरीक्षक संवर्गातील रियाजुद्दीन जैनुद्दीन शेख,लहुजी घोडे व विलास चव्हाण यांची औरंगाबाद ग्रामीण येथे प्रशासकीय बदली झाली आहे. तसेच औरंगाबाद ग्रामीणमधील कार्यरत उपनिरीक्षक शैलेश जोगदंड व रणजीत कासले यांची तसेच उस्मानाबाद येथून हिना कौसर शेख यांची बीड जिल्हा पोलीस दलात प्रशासकीय बदली करण्यात आली आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.