आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नादुरुस्ती:नवीन पाईपलाईनचा प्रस्ताव दाखल, प्रतिक्षेत; महामार्गाच्या कामामुळे नादुरुस्तीसाठी वेळ

अंबाजोगाई21 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

जानेवारी २०२२ पासून अंबाजोगाई नगर परिषदेच्या कार्यकाळाची पाच वर्षांची मुदत संपल्याने जानेवारी २०२२ पासून अंबाजोगाई नगर परिषदेचा कार्यभार प्रशासनाद्वारे चालविण्यात येत आहे. मागच्या पंधरवड्यात वादळी वाऱ्यामुळे काही ठिकाणची झाडे व विद्युत खांव उन्मळून पडले होते.त्यामुळे महावितरण कंपनी कडून विद्युत पुरवठा खंडित करण्यात आला होता . विद्युत पुरवठा सुरळीत झाल्यावर पाणी पुरवठा सुरळीत करण्यात आला त्यामुळे नागरिकांत देखील समाधान व्यक्त केल्या जात आहे.

अंबाजोगाई शहरातील पाणी पुरवठा करणारी पाईपलाईन जवळपास ३० ते ४० वर्षापूर्वीची व सिमेंटची असल्याने ती बदलण्यासाठी नगर विकास मंत्रालयाकडे प्रस्ताव दाखल करण्यात आला आहे व त्याचा पाठपुरावा शासनस्तरावर सुरू आहे . सदर प्रस्ताव मंजूर झाल्यास शहरास दररोज पाणी पुरवठा होणार आहे .मात्र सध्या सहा ते सात दिवसात पाणी पुरवठा केला जात आहे. सध्या शहरातून व शहराबाहेरून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गाचे काम सुरू असल्याने वारंवार पाईपलाईन फुटत आहेत. त्यामुळे देखील सुरळीत पाणी पुरवठा होण्यास अडचण निर्माण होते आहे.

स्वच्छता विभागाचे बीके एनएसएसएस कंपनीचे मागील तीन वर्षांचे जुनेकंत्राट संपल्यामुळे नव्याने स्वच्छतेचे कंत्राट देण्यात आले . सदर कंत्राटदार ०५ जुन २०२२ पासून काम सुरू करणार होता मात्र या कंत्राटदारांच्या आजीचे आकस्मिक निधन झाल्यामुळे शहराचे काम वेळेत सुरू करणे त्यास शक्य झाले नाही .सदर कंत्राटदार दिनांक १० जुन २०२२ पासून शहरात स्वच्छतेचे काम सुरू करत असताना या कामामध्ये काही जणांकडून काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करीत आहेत . नवीन कंत्राटदार हा इतर नगर परिषदेपेक्षा जास्त पगार देण्यास तय्यार आहे .

मात्र काही कामगार संघटना कामावर आलेल्या कर्मचाऱ्याना धमकावून , त्यांना मारहाण करून सुरू केलेले काम बंद करण्यास भाग पाडत आहेत .याबाबत रीतसर तक्रार पोलीस ठाण्यात देण्यात आली आहे. या सर्व प्रकाराचा नाहक त्रास शहरातील नागरिकास सहन करावा लागतो आहे .तेंव्हा अश्या प्रकारे शहरवासीयांना नाहक वेठीस धरून त्यांच्या आरोग्याशी खेळण्याचा प्रयन्त करू नये असेही आवाहन अंबाजोगाई नगर परिषद प्रशासनाकडून केल्या जात आहे .व सदरचा खुलासा अंबाजोगाई नगर परिषद प्रशासनाच्या वतीने करण्यात येत आहे. तसेच शहरातील इतर कामगार संघटना व नेत्यांनी सहकार्य करण्याचे नम्र आवाहन मुख्याधिकारी अशोक साबळे यांनी केले आहे

बातम्या आणखी आहेत...