आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सन्मानित:वृत्तपत्रांच्या साथीने भ्रष्टाचाराची प्रकरणे उघडकीस ; डॉ. गणेश ढवळे समाजरत्न पुरस्काराने सन्मानित

बीड24 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

वृत्तपत्रांच्या साथीने भ्रष्टाचाराची प्रकरणे उघडकीस आणण्याचे कार्य करणाऱ्या, गोरगरिबांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या सामाजिक कार्यकर्ते डॉ.गणेश ढवळे यांना पनवेल येथे आयोजित कार्यक्रमात मान्यवरांच्या हस्ते समाजरत्न पुरस्कार प्रदान करत सन्मानित करण्यात आले. पनवेल येथे या राज्यस्तरीय समाजरत्न पुरस्काराचे आयोजन करण्यात आले होते. महाराष्ट्रातील राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, औद्योगिक.वैद्यकीय, अभिनय, सांस्कृतिक क्षेत्रातील अग्रगण्य व्यक्तींना राज्यस्तरीय समाजरत्न पुरस्कार देण्यात आला.

यामध्ये बीड जिल्ह्यातील सामाजिक कार्यकर्ते तथा कार्याध्यक्ष भ्रष्टाचार निर्मूलन समिती महाराष्ट्र राज्य डॉ.गणेश ढवळे यांनाही गौरविण्यात आले. कोरोना कालावधीत वाड्या, वस्त्या, तांड्यावर जाऊन विनामूल्य आरोग्य सेवा पुरवणे तसेच विविध गैरव्यवहार प्रकरणात नाविन्यपूर्ण आंदोलनाद्वारे भ्रष्टाचार उघडकीस आणणे, शासनास कारवाई करण्यास भाग पाडणे, सर्वसामान्य माणसांना न्याय मिळवून देणारे आदी कामे ढवळे हे करत असल्याने हा पुरस्कार त्यांना प्रदान करण्यात आला. यावेळी संजय पवार, पनवेल महानगरपालिकेचे विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे, शेख युनुस चऱ्हाटकर, दत्तात्रय घरत आदींसह विविध क्षेत्रातील मान्यवर हजर होते

बातम्या आणखी आहेत...