आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फरार:नित्रुडचे जनसेवा आयुर्वेदिक उपचार केंद्र सील; सायंकाळ होताच संधी साधून बोगस वैद्य फरार

दिंद्रुड4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

लोकांची पाठदुखी व हाडांच्या आजारावर उपचार करणाऱ्या नित्रुड येथील जनसेवा आयुर्वेद केंद्रावर माजलगावच्या तहसीलदार वर्षा मनाळे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. मधुकर घुबडे व आरोग्य सहायक, दिंद्रुड पोलिस यांच्या पथकाने बुधवारी दुपारी साडेबारा वाजता अचानक छापा मारला. छाप्याच्या वेळी बोगस वैद्य सुभाष बाबूराव राठोड (रा. नित्रुड, ता. माजलगाव) उपचार केंद्रात आढळून आला होता. या प्रकरणी दिंद्रूड पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यासाठी सायंकाळचे सहा वाजता संधीचा फायदा घेत बोगस वैद्य सुभाष राठोड हा फरार झाला आहे.

माजलगाव-तेलगाव महामार्गावरील नित्रूड येथे कुठलाही वैद्यकीय व्यवसायाचा परवाना नसताना सुभाष राठोड हा जनसेवा आयुर्वेदिक उपचार केंद्राच्या नावाखाली बोगसपणे वैद्यकीय व्यवसाय करत होता. तो रुग्णांना तपासत असल्याचे आढळले. राठोडकडे अनधिकृत वैद्यकीय कागदपत्रांसह आयुर्वेदिक औषधे, गोळ्या त्याच बराेबर रुग्णांची तपासणी रजिस्टर आढळून आले. या प्रकरणी डॉ. अमोल मायकर तक्रारीवरून सुभाष राठोडवर फसवणुक व वैद्यकीय व्यावसायिक अधिनियम १९६१ अन्वये कलम ३३ नुसार गुन्हा दाखल केला आहे. तालुका स्तरीय पथकाने सदरील उपचार केंद्र सील केले होते.

आरोपीला रात्रीतून अटक करू
या प्रकरणात जोपर्यंत गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत आम्हाला त्या आरोपीला अटक करता आली नाही.आरोपी फरार झाला आहे.परंतु, आम्ही त्याला लवकरच रात्रीतून अटक करू. पोलिस त्याच्या मागावर आहेत.
प्रभा पुंडगे, सहायक पोलिस निरीक्षक, दिंद्रुड

पोलिसांनी तक्रार उशिरा दाखल करून घेतली
दिंद्रुड ठाण्यात तक्रार देण्यासाठी दुपारी दोन वाजता गेलो. वीज पुरवठा खंडित झाल्याने तक्रार सायंकाळी ६ वाजता दाखल करून घेतली. तक्रार दाखल करून घेण्यास पोलिसांनी उशिर केला.
-डॉ. मधुकर घुबडे, तालुका वैद्यकीय अधिकारी, माजलगाव.

बातम्या आणखी आहेत...