आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पर्यावरणाला धोका:पालिकेचे ना पथक ना कारवाई; कार्यवाही होण्याची गरज

माजलगाव2 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • माजलगाव शहरात प्लास्टिक बंदी असताना नियम बसवलेत धाब्यावर

शासनाने चार वर्षांपूर्वी संपूर्ण राज्यात ठरावीक जाडीच्या प्लास्टिक वापरावर बंदी घातलेली असताना माजलगाव शहरात मात्र याचा बोजवारा उडाल्याचे दिसून येत आहे. या निर्णयाची अंमलबजावणी करण्यासाठी नगरपालिका प्रशासनाने ना पथक नेमले आहे ना कारवाया केल्या. यामुळे नागरिकांकडून प्लास्टिकचा सर्रास वापर होत असून प्लास्टिक बंदी नावालाच असल्याचे दिसून येत आहे.

महाराष्ट्र शासनाने चार वर्षापूर्वी संपूर्ण राज्यात प्लास्टिक बंदीचा निर्णय घेत त्याची काटेकोर अंमलबजावणी करण्याचे निर्देशही संबंधित विभागाला दिले होते. बंदीच्या आदेशानंतर काही दिवस पालिका प्रशासनाने ठिकठिकाणी प्लास्टिक वापरणाऱ्या व्यावसायिक, नागरिकांवर कारवाई करून दंड आकारले. सुरुवातीला राज्यातील महानगरपालिका, नगरपालिका प्रशासनाने प्लास्टिक बंदी निर्णयाची अंमलबजावणी करण्यासाठी पथक निर्माण करून प्लास्टिक वापरणाऱ्यांवर दंडात्मक कारवायाही केल्या; परंतु माजलगाव नगरपालिका मात्र याबाबत अनभिज्ञ असल्याचे दिसून येत आहे. शासनाच्या या निर्णयाची अंमलबजावणी करण्यासाठी पालिका प्रशासनाने ना पथक नेमले ना आतापर्यंत कोणावर कारवाई केली.

यामुळे शहरात सर्रास प्लास्टिक पिशव्यांचा वापर होताना दिसून येत आहे. सुरुवातीला नागरिकांत भीतीचे वातावरण निर्माण झाले होते; परंतु कोणावरच कारवाई होत नसल्याने बाजारात पूर्वीप्रमाणेच प्लास्टिक पिशव्यांचा वापर सुरू झाला आहे. व्यापाऱ्यांमध्ये बंदीच्या निर्णयाबाबत संभ्रम असून कोणत्या प्लास्टिकवर बंदी आहे व कोणत्या नाही याबाबतची सखोल माहिती अद्यापही नाही. काही सुज्ञ नागरिकांनी शासनाच्या या निर्णयाची अंमलबजावणी स्वयंस्फूर्तीने करण्यास सुरुवात केली. रविवार, बुधवारच्या आठवडी बाजारात अनेकांच्या हातात कापडी पिशव्या दिसून येतात. शासनाच्या या चांगल्या निर्णयाची अंमलबजावणी करण्यासाठी पालिका प्रशासनाने पथक नेमून पाहणी करून कारवाया कराव्यात अशी मागणी नागरिकांतून होत आहे.

कायद्याची भीती निर्माण होण्यासाठी पथक
शासनाचा हा निर्णय सार्वजनिक हिताचा असून अत्यंत महत्त्वपूर्ण असल्याने याची काटेकोर अंमलबजावणी होणे गरजेचे आहे. प्लास्टिक वापरणाऱ्यांना कायद्याची भीती निर्माण होण्यासाठी पथकाची नेमणूक करणे गरजेची आहे.
-राजेंद्र होके पाटील.

बातम्या आणखी आहेत...