आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करादळणवळणासाठी पुल नसल्याने ग्रामपंचायतीच्या निवडणूकीवर बहिष्कार टाकणाऱ्या सौताड्याच्या शिंदेवस्तवरील नागरिकांच्या सुरक्षित प्रवासासाठीचे तराफे जाळले गेले होते. त्यामुळे, पुन्हा आता शिंदेवस्तीवरच्या नागरिकांच्या नशीबी थर्माकोलवरुन जीवघेणा प्रवास आला आहे. चिमुकल्यांनाही जीवावर उदार होत शाळेत जावे लागत आहे. पाटोदा तालुक्यातील सौताडा ग्रामपंचायती अंतर्गत येणाऱ्या शिंदे वस्तीला जोडणारा रस्ता नाही.
तलवातून थर्माकोलवरुन इथल्या नागरिकांना गावात येजा करावी लागते, विद्यार्थ्यांनाही अशाच प्रकारे शाळेत यावे लागते. वर्षभरापूर्वी सामाजिक कार्यकर्ते डॉ. गणेश ढवळे यांच्या माध्यमातून मुंबईच्या बांद्रेकरवाडी गणेश मंडळाने शिंदेवस्तीकरांना चांगल्या दर्जाचे आणि सुरक्षित प्रवासासाठी तराफे दिले होते. दाेन दिवसांपूर्वी मध्यरात्रीच्या सुमारास तराफे जाळले गेले होते.
थर्माकोल खराब झाले तराफे मिळाल्यानंतर थर्माकोलचा वापर बंद होता. त्यामुळे ते पडून होते. त्याच्या कामट्याही कुचक्या झाल्या आहेत. तराफे जाळल्यानतर जीवावर उदार होऊन मुलांना शाळेत सोडत आहोत. - बाबू शिंदे, ग्रामस्थ
मी थाेडक्यात बचावलाे आम्ही दोघे थर्माकोलवरुन शाळेसाठी जात होतो त्यावेळी अचानक लाट आली आणि आमचा तोल गेला. मी पाण्यात पडलो. मला पोहता येईना पण वडिल आणि काका सोबत होते त्यांनी मला वाचवले. - स्वराज शिंदे, इयत्ता चौथी
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.