आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराप्रत्येक शाळेत स्वच्छतागृह असावे व तेही सुरु असावे, यासाठी शासनाकडून नेहमीच गाजावाजा करून त्यावर दुरुस्ती व बांधकामासाठी मोठा खर्चही केला जातो. मात्र प्रत्यक्षात पाटोदा शहरासह तालुक्यातील बहुतांश जि.प. शाळांमधील स्वच्छतागृहही दुरूस्ती अथवा पाण्याअभावी कुलूपबंद असल्याचा प्रकार समोर येत आहे. शिक्षकांबरोबर विद्यार्थ्यांचीही गैरसोय व कुचंबना होत आहे. या गंभीर प्रश्नाकडे ना शिक्षण विभागाचे लक्ष आहे ना लोकप्रतिनिधींचे. त्यामुळे ही गैरसोय कशी थांबणार हा प्रश्र कायम आहे. शाळा म्हणजे ज्ञानार्जनाचे मंदिर समजले जाते. अशा या ज्ञानाच्या मंदिरांतून जिथे विद्यार्थ्यांना स्वच्छतेचे धडे दिले जातात.
अशाच बहुतांश शाळांमध्ये सध्या केवळ दुरुस्ती व प्रामुख्याने पाण्याच्या सोयीअभावी स्वच्छतागृह बंद असल्याचे चित्र आहे. पाटोदा तालुक्यात एकुण १८४ जि. प.च्या शाळा असून या शाळांमध्ये साधारणतः १७ हजारांच्यावर विद्यार्थी ज्ञानार्जन करतात. यातील बहुतांश ठिकाणी विविध योजनांमधून अवाढव्य खर्च करून शाळांच्या इमारती बांधण्यात आल्या. या इमारतींमध्ये अर्थात स्वच्छतागृहही बांधण्यात आले तर काही ठिकाणी शाळांच्या जुन्याच इमारती आहेत. आता नुकतीच नवीन शैक्षणिक वर्षाला सुरूवात झाली असून कोरोनाच्या संकटात बंद असलेल्या शाळा पुन्हा नव्याने सुरु झाल्याने विद्यार्थ्यांमध्ये मोठा उत्साह आहे. या सर्व शाळांमधील बहुतांश शाळांमधील स्वच्छतागृह सध्या बंद अवस्थेत आहेत त्यामुळे अशा शाळांमध्ये ज्ञानदानाचे काम करणारे शिक्षक व ज्ञानार्जन करणारे विद्यार्थी यांची मोठी कुचंबना होत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे ही कुचंबना दूर करण्यासाठी प्रशासनाने वेळीच याबाबत निर्णय घेण्याची आवश्यकता आहे.
पाटाेदा येथील जिल्हा परिषद शाळेचे बंद अवस्थेतील स्वच्छतागृह
पाहणीनंतर कारवाई करू स्वच्छतागृहांबाबत पाटोदा शहरातील काही शाळांमध्ये जाऊन प्रत्यक्ष पडताळणी केली असता काही ठिकाणी दुरुस्ती अभावी तर काही ठिकाणी पाणीच उपलब्ध नसल्याने स्वच्छतागृह कुलुपबंद असल्याचे आढळुन आले. या संदर्भात शिक्षण विभागाशी संपर्क साधला असता गटशिक्षणाधिकारी पिकवणे यांनी आपण या ठिकाणी नुकताच पदभार घेतला असून सर्व माहिती घेऊन पुढील कार्यवाही करु अशी प्रतिक्रिया दिली.
शासन धोरणाला यंत्रणेच्या दुर्लक्षामुळे हरताळ शासनाच्या धोरणानुसार प्रत्येक शाळेत स्वच्छतागृह असणे व ते चालु अवस्थेत असणे आवश्यक आहे. मात्र असे असतानाही पाटोदा शहरातील व ग्रामीण भागातील बहुतांश शाळांमध्ये स्वच्छतागृह कुलूपबंद अवस्थेत दिसून येत आहे. त्यामुळे शासनाच्या धोरणाला हरताळ फासला जात आहे.
पाहणीनंतर कारवाई करू स्वच्छतागृहांबाबत पाटोदा शहरातील काही शाळांमध्ये जाऊन प्रत्यक्ष पडताळणी केली असता काही ठिकाणी दुरुस्ती अभावी तर काही ठिकाणी पाणीच उपलब्ध नसल्याने स्वच्छतागृह कुलुपबंद असल्याचे आढळुन आले. या संदर्भात शिक्षण विभागाशी संपर्क साधला असता गटशिक्षणाधिकारी पिकवणे यांनी आपण या ठिकाणी नुकताच पदभार घेतला असून सर्व माहिती घेऊन पुढील कार्यवाही करु अशी प्रतिक्रिया दिली. शासन धोरणाला यंत्रणेच्या दुर्लक्षामुळे हरताळ शासनाच्या धोरणानुसार प्रत्येक शाळेत स्वच्छतागृह असणे व ते चालु अवस्थेत असणे आवश्यक आहे. मात्र असे असतानाही पाटोदा शहरातील व ग्रामीण भागातील बहुतांश शाळांमध्ये स्वच्छतागृह कुलूपबंद अवस्थेत दिसून येत आहे. त्यामुळे शासनाच्या धोरणाला हरताळ फासला जात आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.