आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अजामीनपात्र वॉरंट:राज ठाकरेंविरुद्ध परळी कोर्टाचे अजामीनपात्र वॉरंट, शहरात दगडफेकीचे प्रकरण, चिथावणीखोर वक्तव्य अंगलट

परळी19 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

राज ठाकरे यांना परळी येथील न्यायालयाने दुसऱ्यांदा अजामीनपात्र वॉरंट बजावले आहे. राज या प्रकरणात सातत्याने गैरहजर राहिल्याने हे वॉरंट बजावले असून ६ जुलैपर्यंत उपस्थित राहण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत, अशी माहिती अॅड. आर. व्ही. गिते यांनी दिली.

राज ठाकरे यांना २२ ऑक्टोबर २००८ रोजी मुंबई पोलिसांनी अटक केली होती. या अटकेच्या निषेधार्थ परळी येथील मनसे कार्यकर्त्यांनी परळी-गंगाखेड रोडवरील धर्मापुरी फाटा येथे सार्वजनिक परिवहन महामंडळाच्या बसवर तुफान दगडफेक केली होती. यात सार्वजनिक

मालमत्तेचे नुकसान व जमावबंदी आदेशाचे उल्लंघन, चिथावणीखोर वक्तव्य केल्याप्रकरणी राज ठाकरे यांच्यासह परळीतील मनसे कार्यकर्त्यांविरोधात परळी ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी तपास करून राज ठaाकरे व त्यांच्या कार्यकर्त्यांविरुद्ध परळी न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते. याप्रकरणी राज ठाकरे व त्यांच्या कार्यकर्त्यांनी जामीन मिळूनही न्यायालयात सतत गैरहजर राहिल्यामुळे त्यांच्याविरुद्ध ६ जानेवारी रोजी अजामीनपात्र वॉरंट जारी करत १० फेब्रुवारी २०२२ पर्यंत परळी न्यायालयात हजर राहण्याचे आदेश दिले होते. या प्रकरणातील मनसेचे तत्कालीन पदाधिकारी संजय अघाव, प्रल्हाद सुरवसे, अनिस बेग, शिवदास बीडगर, राम लटपटे या पाच जणांनी न्यायालयात हजर होत अजामीनपात्र वॉरंट रद्द केले. परंतु राज ठाकरे हजर झाले नसल्याने त्यांच्याविरुद्ध दुसऱ्यांदा अजामीनपात्र वॉरंट बजावण्यात आले आहे.

हजर झाल्यास वॉरंट रद्द
परळी न्यायालयाने मनसे अध्यक्ष राज ठाकरे व इतर पाच जणांविरुद्ध अजामीनपात्र वॉरंट जारी केले असले तरी हा गुन्हा राजकीय गुन्ह्यात मोडत असल्याने न्यायालयाने दिलेल्या तारखेत राज ठाकरे किंवा त्यांचे वकील हजर राहून हे वॉरंट रद्द करू शकतात.
- ॲड. आर. व्ही. गित्ते, परळी.

...तर अटकेची कारवाई
या गुन्ह्याप्रकरणी परळी न्यायालयाने जारी केलेले अजामीनपात्र वॉरंट आम्हाला प्राप्त झाले आहे. याप्रकरणी एका कर्मचाऱ्याची नियुक्ती करण्यात आली आहे. पोलिस अधीक्षक व वरिष्ठ अधिकाऱ्यांचे मार्गदर्शन घेत सूचना मिळाल्यानंतर राज ठाकरे यांना अटक केली जाईल. - मारोती मुंडे, सपोनि, परळी ग्रामीण पोलिस ठाणे.

बातम्या आणखी आहेत...