आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अंबाजोगाई:‘स्वाराती’च्या शंभराहून अधिक वैद्यकीय शिक्षकांचा असहकार

अंबाजोगाई2 महिन्यांपूर्वीलेखक: प्रतिनिधी
  • कॉपी लिंक

स्वामी रामानंद तीर्थ शासकीय ग्रामीण रुग्णालयाच्या महाराष्ट्र शासकीय वैद्यकीय शिक्षक संघटनेच्या वतीने वैद्यकीय शिक्षकांचे अत्यंत महत्त्वाच्या मागण्यांसाठी १४ मार्च पासून दैनंदिन रुग्णसेवा व दैनंदिन शस्त्रक्रिया बंद ठेवून काम बंद आंदोलन पुकारले आहे.या आंदोलनामध्ये शंभराहून अधिक डॉक्टरांनी सहभाग नोंदवला.

महाराष्ट्र राज्यातील वैद्यकीय शिक्षकांचे जिव्हाळ्याचे प्रश्र वेळोवेळी पाठपुरावा करूनही सुटलेले नाहीत. त्यामुळे राज्यातील सर्व महाविद्यालयातील वैद्यकीय शिक्षण व रुग्णसेवेच्या दर्जावर परिणाम होत आहे. मागील पन्नास दिवसापासून वैद्यकीय शिक्षकांचे धरणे आंदोलन राज्यातील सर्व महाविद्यालयांमध्ये चालू आहे . सुरुवातीच्या काळात असहकार धोरण अवलंबवीण्यात आले . पदव्युत्तर शिक्षक पदांचे सामुहिक राजीनामे देण्यात आले . त्यानंतर अतिरिक्त प्रशासकीय काम बंद करण्यात आले . तसेच पदवीपूर्व व पदव्युत्तर वैद्यकीय शिक्षण व विद्यापीठाचे संबंधित कामकाजावर बहिष्कार टाकण्यात आला . त्या उपरही शासनाने दखल न घेतल्याने शासनाचे लक्ष वेधण्यासाठी मार्च महिन्यात काळा दिवस पाळून , कॅन्डल मार्च व घंटानाद आंदोलन करण्यात आले , वरील सर्व असहकार आंदोलन करूनही शासनाने वैद्यकीय शिक्षकांच्या मागण्यांकडे जाणीव पुर्वक दुर्लक्ष केल्याचे निदर्शनास आल्याने नाइलाजाने संघटनेला दि.१४ मार्च पासून दैनंदिन रुग्णसेवा व दैनंदिन शस्त्रक्रिया बंद ठेवून काम बंद आंदोलन पुकारले आहे. डॉ .विनोद वेदपाठक , डॉ .प्रशांत देशपांडे, डॉ .राजेश कचरे, डॉ शंकर धपाटे, डॉ .दीपक लामतुरे, डॉ. सिद्धेश्वर बिराजदार, डॉ. नितीन चाटे, डॉ. सतीश गिरेबोईनवाड, डॉ. संदीप निळेकर, डॉ सुधीर भिसे, डॉ. विश्वजित पवार, डॉ.नागेश अब्दागिरे, डॉ. दीपाली कुलकर्णी, डॉ. निलीमा पाटील, डॉ. सविता सोमाणी, डॉ .शीला गायकवाड, डॉ. दीपाली देव, डॉ .अपर्णा कुलकर्णी सह शंभर डॉक्टरांचा आंदोलनात सहभाग आहे.

बातम्या आणखी आहेत...