आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मार्गदर्शन:मानवाच्या आरोग्यासाठी विषमुक्त शेती आजच्या काळाची प्रमुख गरज; राज्याचे माजी कृषी आयुक्त पांडुरंग वाठारकर यांचे प्रतिपादन

अंमळनेर4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

जगात आज अनेक उद्योगात स्पर्धा निर्माण झाली आहे. परंतु शेतीकडे वळताना अनेकांना भीती वाटते. आपला देश कृषिप्रधान आहे. या देशात अनेक संत व ऋषींनी शेतीत वेगवेगळे यशस्वी प्रयोग केले. या यशस्वी प्रयोगातून शेती उत्पादन, अन्नधान्य फळे, आयुर्वेदिक औषधे तयार झाली. प्राचीन काळात शेती संपन्न आणि प्रगतीवर होती.गावातील माणसांच्या अनेक गरजा गावात भागत होत्या. आज प्रत्येक माणूस रात्रंदिवस काम करून पैसा कमी पडतो व दर्जेदार अन्न मिळत नाही. मानवाच्या आरोग्यासाठी विषमुक्त शेती करणे काळाची गरज बनली आहे. त्यासाठी युवकांनी शेतीत प्रयोग करून विषमुक्त अन्नधान्य, फळे, भाजीपाला यांचे उत्पादन घ्यावे, असे आवाहन राज्याचे माजी कृषि आयुक्त पांडुरंग वाठारकर यांनी केले.

पाटोदा तालुक्यातील कुसळंब येथे मानवता मंदिर शेतकरी उत्पादक कंपनी यांच्या वतीने आयोजित अध्यात्मिक शेती कार्यशाळेच्या कार्यक्रमात ते बोलत होते. व्यासपीठावर कंपनीचे अध्यक्ष वसंत पवार, सचिव बन, नैसर्गिक शेती तज्ज्ञ उंदरे पाटील, द्राक्ष महासंघाचे गव्हाणे, भारत गर्जे, सेंद्रीय शेती तज्ज्ञ प्रा.गोसावी, निवडुंग्याचे उपसरपंच भाऊसाहेब पवार, सेंद्रिय आंबा उत्पादक शेतकरी भगवान तांदळे उपस्थित होते. पाटोदा तालुका हा डोंगराळ भाग आहे. या भागात सेंद्रिय शेती फळबाग गोपालन व्यवसायातून शेती उत्पन्न वाढेल. याकरिता बांधावर झाडे लावणे, विहीर, बोअर व तलावाचे पाणी यांची व्यवस्था करणे. यासह ठिबक व तुषार वापरणे, गट शेती करणे, प्रत्येक हंगामात आंतरपीक घेणे, केंद्र राज्य शासनाच्या योजनांचा फायदा घेणे या गोष्टी आवश्यक आहेत. आपल्याला गरजेची योजना घेऊनच विषमुक्त शेती यशस्वी करावी, असे आवाहन त्यांनी केले. याप्रसंगी प्रगतशील शेतकरी विश्वास उंद्रे यांनीही मार्गदर्शन केले.

शेती करताना आळस बाजूला ठेवला पाहिजे. इतर प्रगतिशील शेतकऱ्यांचा अनुभव, नवे तंत्रज्ञान व शेतीसाठी शेणखत, गोमूत्र, पालापाचोळा, गांडूळ खत वापरले पाहिजे. शेती नांगरणीनंतर शेण खत टाकल्यास तीन वर्ष फायदा होईल. बाजरी टोमॅटो व हरभरा पीक फेरपालट करावी. तुर, कापूस पिकात मिरची उडीद मुग आंतरपीक घ्यावे, असेही त्यांनी सांगितले.

चांगली हवा, अन्न, पाणी भेटले तर आरोग्य चांगले
खराब व मुरमाड जमिनीत बांधावर झाडे लावल्याने सेंद्रिय कर्ब तयार होऊन त्या जमिनीत शेण खत टाकल्यास सुपीक जमीन तयार होते. जगाला अन्न, पाणी, हवा चांगली भेटल्यास माणसाचे, प्राण्यांचे आरोग्य चांगले राहील. चांगला आहार सकारात्मक विचार देतो. आनंदी मनाने शाकाहार घेतल्यास माणसात सद्विचार, आनंद सद्भावना जागृत होतात, असे वसंत पवार यांनी सांगितले.

बातम्या आणखी आहेत...