आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

आष्टी:दरोडा टाकताना शेतकऱ्यावर कत्तीने हल्ला, जमावाच्या मारहाणीत कुख्यात दरोडेखोर ठार

आष्टी (जि.बीड)3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • तीन साथीदार पळाले, चौथा जमावाच्या सापडला तावडीत

शेतवस्तीवर दरोडा टाकण्यासाठी गेलेेल्या चार दरोडेखोरांच्या टोळक्याने शेतकऱ्याच्या मुलावर कत्तीने हल्ला केला. या वेळी मुलाने आरडाओरडा करताच वस्तीवरील इतर ग्रामस्थ मदतीला धावले. याप्रसंगी तीन दरोडेखोर पळालेे, परंतु लपून बसलेला एक कुख्यात दरोडेखोर विशाल ऊर्फ हकीम नारायण भोसले (३८, रा. वाहिरा) यास संतप्त जमावाने घेरून बेदम मारहाण केली. या मारहणीनंतर सोमवारी उपचारावेेळी दरोडेखोराचा मृत्यू झाला. रविवारी मध्यरात्री आष्टी तालुक्यातील फत्तेवडगाव येथे ही घटना घडली.

रविवारी रात्री बारा-सव्वाबाराच्या सुमारास चार दरोडेखोर शेतकरी मोहन काळे यांच्या घरात शिरले. दरोडा टाकत असताना काळे यांचा मुलगा हनुमंत याला जाग आल्याने त्याने प्रतिकाराचा प्रयत्न केला असता दरोडेखोर हकीम भोसले याने कत्तीने वार केले. या वेळी जखमी हनुमंतची आरडाओरड ऐकून वस्तीवरचे लोक जागे झाले. त्यामुळे दरोडेखोर पळाले. ग्रामस्थांनी दरोडेखोरांच्या दिशेने मोर्चा वळवला. जमाव आपला पाठलाग करत असल्याचे पाहून तीन दरोडेखोर गावाकडे पळाले, तर हकीम हा शेजारील शेतात लपून बसला होता. जमावाने त्याला घेरताच तो अंगावर कत्ती घेऊन धावला. जमावाने हकीमला याला बेदम मारहाण केली. या मारहाणीत तो जखमी झाला. गंभीर जखमी झाल्यामुळे पोलिसांनी त्यास ग्रामीण रुग्णालयात दाखल केले होते. दरम्यान, सोमवारी जिल्हा पोलिस अधीक्षक हर्ष पोद्दार, आष्टीचे उपअधीक्षक विजय लगारे, तहसीलदार वैभव महेंद्रकर, पोलिस निरीक्षक माधव सूर्यवंशी, सहायक पोलिस निरीक्षक सलीम पठाण, ज्ञानेश्वर कुकलारे यांनी फत्तेवडगाव येथे भेट देऊन पाहणी केली.

मृत दरोडेखाेराविरोधात बीड, जामखेड, बारामतीमध्येही गुन्हे

काळे यांच्या घराजवळ शुक्रवारी काही दरोडेखोर दबा धरून बसल्याचे काहींनी पाहिले होते. अखेर रविवारी रात्री त्यांनी दरोडा टाकण्याचा प्रयत्न केला. मात्र, हा प्रयत्न फसल्याने हकीम दरोडेखोराला प्राणास मुकावे लागले. हकीम नारायण भोसले हा रेकॉर्डवरील गुन्हेगार असून जामखेड, बारामती, बीड जिल्ह्यात त्याच्यावर ८ गुन्हे दाखल आहेत.