आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लोकार्पण सोहळा:जिल्ह्याची घडी बसवण्यासाठी आता सर्वांनी एकत्र यायला हवे; पालकमंत्री धनंजय मुंडेंचे भावनिक आवाहन

बीड2 महिन्यांपूर्वीलेखक: प्रतिनिधी
  • कॉपी लिंक

आज आमदार मेटे व्यासपीठावर आले असे यापूर्वी कधी दिसले नाही. त्यांच्याप्रमाणे आता सर्वांनी एकत्र येऊन एकाच व्यासपीठावर आपल्या जिल्ह्याची घडी बसवणे गरजेचे आहे. कामाच्या पाटीसाठी नाव आहे, ती लागावी म्हणून काम आहे. जिल्हा परिषद निवडणुकीत भविष्यात कोणीही निवडून येवो, माझ्या त्यांना शुभेच्छाच आहेत. ज्यांची सदस्य म्हणून इच्छा आहे त्यांनासुद्धा माझ्या शुभेच्छा असल्याचे सामाजिक न्यायमंत्री तथा पालकमंत्री धनंजय मुंडे म्हणाले. दरम्यान, बीड जिल्हा परिषदेवर येत्या सोमवार, दि. २१ मार्चपासून प्रशासक येत आहेत. प्रशासक आल्यावर जिल्हा परिषदेच्या नूतन प्रशासकीय इमारतीच्या कोनशिलेवर आपली नावे येणार नाहीत याची दक्षता घेऊन जिल्हा परिषदेच्या सत्ताधाऱ्यांनी शनिवारी लोकार्पणाची घाई केल्याची चर्चा जिल्ह्यात रंगत आहे.

जिल्हा परिषदेत शनिवारी दुपारी २ वाजता प्रशासकीय इमारतीच्या लोकार्पणप्रसंगी व्यासपीठावरून सामाजिक न्यायमंत्री मुंडे बोलत होते. व्यासपीठावर राज्यमंत्री अब्दुल सत्तार, आमदार विनायक मेटे, प्रकाश सोळंके, संदीप क्षीरसागर, संजय दौंड, बाळासाहेब आजबे, माजी आमदार साहेबराव देरकर, सय्यद सलीम, पृथ्वीराज साठे, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अनिल जगताप, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष राजेश्वर चव्हाण, जि. प. अध्यक्षा शिवकन्या सिरसाट, जि. प. उपाध्यक्ष बजरंग सोनवणे, जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा, सीइओ अजित पवार आदी उपस्थित होते.

आमदार मेटे भाजपचेच
आज मेटेंचा वेगळा पक्ष असला तरीही आमदार म्हणून ते भाजपचेच आहेत. नामांकन अर्जावर भाजप म्हणून त्यांनी लिहिलेले मी पाहिले आहे. मेटे साहेबांची एक इच्छा पूर्ण होईल, परंतु माणसाच्या काही इच्छा जिवंत असेपर्यंत पूर्ण होत नाहीत, असे धनंजय मुंडेंनी सांगताच हास्याचे फवारे उडाले. जि.प. व पं.स. इमारतीचे काम जिल्ह्यात मार्गी लागले. आता गावांचा विकास महत्त्वाचा आहे, मुंडे म्हणाले.

बातम्या आणखी आहेत...