आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गर्भाशयाची शस्त्रक्रिया:आता गर्भाशय शस्त्रक्रियांसाठी परवानगीचा बीड पॅटर्न राज्यभर

बीड4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

गर्भाशयाची शस्त्रक्रिया करण्यासाठी जिल्हा शल्यचिकित्सकांची पूर्वपरवानगी घेणे बीड जिल्ह्यात बंधनकारक आहे. आता राज्यभर हा बीड पॅटर्न लागू करण्याच्या सूचना विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी दिल्या आहेत. सोबतच ऊसतोड कामगार महिलांच्या आरोग्य तपासणी आणि कारखाना स्थळावर मिळणाऱ्या सोयी-सुविधांचीही पडताळणी करण्याचे निर्देश गोऱ्हे यांनी दिले. ऊसतोड कामगार महिलांची आरोग्य तपासणी आणि गर्भाशय शस्त्रक्रिया या विषयावर बुधवारी विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे बैठक घेतली. आरोग्यमंत्री तानाजी सावंत, आरोग्य आयुक्त डॉ. नितीन अंबाडेकर, साखर आयुक्त, कामगार आयुक्त यांच्यासह सर्व जिल्हा शल्यचिकित्सक आणि जिल्हा आरोग्य अधिकारी यांची ऑनलाइन उपस्थिती होती. बीडला २०१९ मध्ये गर्भाशय शस्त्रक्रियांचे प्रकरण समोर आले होते. यानंतर नीलम गोऱ्हे यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली हाेती

बातम्या आणखी आहेत...