आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मेळावा:ओबीसी विभागाच्या मेळावा; अशोक केकान यांच्यामुळे काँग्रेसला बळ

शिरूर11 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

तालुक्यातील खोकरमोह, रायमोहा जिल्हा परिषद गटाचे युवा नेते अशोक बाजीराव केकाण यांचा मुंबई येथील ओबीसी विभागाच्या मेळाव्यात काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या प्रमुख उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश झाला. या प्रवेशाने काँग्रेसला बळ मिळाले आहे.

मंत्री बाळासाहेब थोरात, विजय वडेट्टीवार, खासदार रजनी पाटील, माजी मंत्री अशोक पाटील, बीड काँग्रेस जिल्हाध्यक्ष राजेसाहेब देशमुख, उपाध्यक्ष राहुल सोनवणे, जिल्हा उपाध्यक्ष नवनाथ थोटे, शिरूर तालुकाध्यक्ष रमेश सानप, युवा नेते संभाजी जाधव यांची प्रमुख उपस्थिती होती. येणाऱ्या जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये अशोक केकान यांच्या काँग्रेस प्रवेशामुळे मोठा आधार मिळणार आहे. या निवडीबद्दल तालुक्यातील ज्येष्ठ नेते भास्कर केदार, शिरूर शहराध्यक्ष आसिफ शेख, बारीकराव खेगरे, युवक काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस सुनील नागरगोजे, राज्य मीडियाचे सरचिटणीस संजय खटाणे, अशोक बहिरवाळ, हरिभाऊ सावंत, दादासाहेब तासतोडे, राम शेळके, अॅड.जरांगे, कानिफनाथ विघ्ने, नारायण गिरी, ज्ञानेश्वर ढवळे, श्रीकांत विघ्ने, संदीप केदार आदींनी अभिनंदन केले आहे.

बातम्या आणखी आहेत...