आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘आंदोलनांचा वार’:​​​​​​​ओबीसी राजकीय आरक्षणाच्या निर्णयाविरोधात बीडला राष्ट्रीय महामार्ग रोखला; महागाईच्या मुद्द्यावर माकपची निदर्शने

बीड4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • रास्ता रोकोमुळे वाहतूक तासभर ठप्प; माजलगाव, अंबाजोगाई, परळी येथे दुचाकी रॅली काढून वेधले प्रशासनाचे लक्ष

ओबीसींचे राजकीय आरक्षण घटनात्मक अटींच्या पूर्ततेअभावी स्थगित केले गेले, हे आरक्षण वाचवण्याबरोबरच अन्य महत्त्वाच्या मागण्यांसाठी गुरुवारी सकाळी ११ वाजता धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील बीड बायपास चौकात रास्ता रोको आंदोलन केले. या आंदोलनामुळे तासभर वाहतूक ठप्प झाली होती. तर दुसरीकडे पेट्रोल-डिझेल दरवाढीसह जीवनावश्यक वस्तूंच्या वाढत्या महागाईविरोधात माकपच्या वतीने माजलगावात दुचाकी रॅली काढून तहसील कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली. अंबाजोगाईत उपजिल्हाधिकारी कार्यालयावर, तर परळीत तहसील कार्यालयासमोर माकपच्या वतीने निदर्शने करण्यात आली.

ओबीसींचे राजकीय आरक्षण वाचवण्यासाठी तसेच ओबीसी जनगणनेसह विविध मुद्द्यांवर केंद्र सरकारविरोधात अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेने सर्व ओबीसी संघटनांना सोबत घेऊन समता परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष छगन भुजबळ यांच्या मार्गदर्शनात गुरुवारी सकाळी ११ वाजता धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील बीड बायपास चौकात रास्ता रोको आंदोलन केले. या आंदोलनामुळे जालना रोड, बीड रोड आणि बायपासवरील वाहतूक तब्बल तासभर ठप्प होती. यामुळे महामार्गाच्या सर्वच बाजूंनी वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. या आंदोलनात समता परिषदेचे जिल्हाध्यक्ष अॅड. सुभाष राऊत, बंजारा समाजाचे नेते प्रा. पी. टी. चव्हाण, जे. डी. शहा, प्रा. ईश्वर मुंडे, गणेश जगताप, अॅड. संदीप बेदरे, विष्णू देवकते, संजय गुरव, गणेश पुजारी, जिल्हाध्यक्ष रफिक बागवान, मतकर, मीना देवकते, नंदा सारुक, धनंजय वाघमारे, सदाशिव बिडवे, रमेश पवार, नितीन साखरे, निखिल शिंदे, नितीन राऊत, धनंजय काळे, दत्ता प्रभाळे, बाबा घोडके, अजय शिंदे, अविनाश उगले, राम कटारे, अजय कोकाटे आदींसह नागरिक सहभागी झाले होते.

माजलगाव : इंधन दरवाढ रोखा
माजलगाव शहरात माकपच्या वतीने गुरुवारी डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकापासून तहसील कार्यालयापर्यंत दुचाकी रॅली काढून पेट्रोल, डिझेल इंधनासह डाळ, गोडेतेल आदी जीवनावश्यक वस्तूंचे भाव कमी करा, खतांचे भाव कमी करा, शेतकरी विरोधी कृषी कायदे रद्द करा, शेतकऱ्यांना विनाअट तीन लाखांचे कर्ज मंजूर करा, अशा जोरदार घोषणा देत तहसील कार्यालयावर दुचाकी रॅली धडकली. त्यानंतर तहसीलसमोर निदर्शने करून तहसीलदारांना निवेदन दिले. आंदोलनात तालुका सेक्रेटरी मुसद्दीक बाबा, डीवायएफआयचे मोहन जाधव, अॅड. सय्यद याकूब ,बळीराम भुंबे, सादेक पठाण, शिवाजी कुरे, मुस्तकीम शेख, शांतीलाल पटेकर, पप्पू हिवरकर आदींसह नागरिक सहभागी होते.

परळी : तहसीलवर केले निदर्शने
अ.भा. किसान सभा व माकपच्या वतीने महागाईसह शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर गुरुवारी परळी तहसील कार्यालयासमोर निदर्शने केली. यावेळी प्रशासनाच्या वतीने पेशकार विठ्ठल जाधव, शेख सलीम यांनी शिष्टमंडळाशी चर्चा करून निवेदन स्वीकारले. या आंदोलनात माकपचे राज्य सचिव मंडळ सदस्य पी. एस. घाडगे, सीटूचे जिल्हाध्यक्ष बी. जी. खाडे, किसान सभेचे पांडुरंग राठोड, मुरलीधर नागरगोजे, माकपचे तालुका सचिव गंगाधर पोटभरे, पं. स. सदस्य सुदाम शिंदे, किरण सावजी, अश्विनी खेत्रे, मनोज स्वामी, प्रवीण देशमुख, अण्णासाहेब खडके, अंकुश उबाळे, अशोक नागरगोजे, राधाकिशन जाधव, महादेव शेरकर आदींसह नागरिक सहभागी होते.

अंबाजोगाई : उपजिल्हाधिकारी कार्यालयावर निदर्शने
भाकपच्या वतीने अंबाजोगाई शहरातील उपजिल्हाधिकारी कार्यालयावर निदर्शने केली. यावेळी विविध मागण्यांचे निवेदन उपजिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले. यावेळी बब्रुवाहन पोटभरे, अजय बुरांडे, प्रशांत मस्के, सुहास चंदनशिव, कीर्ती कुंठे, धीरज वाघमारे, राहुल धोतरे, सुमीत आवाडे, सचिन टिळक, जगन्नाथ पाटोळे, अशोक शेरकर, महेश देशमुख आदी सहभागी झाले होते.

जुलै महिन्यात आक्रोश मोर्चा
आरक्षणाच्या प्रश्नावर लोकांच्या मनात असलेला संभ्रम दूर करण्याचा प्रयत्न करून जनजागृती करण्याची गरज आहे. स्थानिक स्वराज्य संस्थेतील ओबीसी समाजाचे रद्द केलेले राजकीय आरक्षण पूर्ववत करून ओबीसी समाजाची जातीनिहाय जनगणना व अन्य मागण्या मान्य न केल्यास येत्या जुलै महिन्यात आक्रोश मोर्चा काढण्यात येणार आहे अॅड. सुभाष राऊत, समता परिषद, जिल्हाध्यक्ष.

बातम्या आणखी आहेत...