आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गणपती उत्सव:सामाजिक उपक्रमातून श्री गणेशास वंदन करावे ; पोलिस निरीक्षक वाघमोडे यांचे आवाहन

केजएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

गणपती उत्सव हा आनंदाने साजरा करायचा असतो. मंडळांनी सामाजिक प्रबोधन व समाजोपयोगी उपक्रम राबवून गणेशास वंदन करावे, असे आवाहन केज ठाण्याचे प्रमुख सहायक पोलिस निरीक्षक शंकर वाघमोडे यांनी केले.केज शहरातील प्रशांतनगर भागातील वक्रतुंड गणेश मंडळाने स्थापन केलेल्या श्री गणेशाची आरती गुरुवारी (ता. १ सप्टेंबर)सहाय्यक पोलिस निरीक्षक शंकर वाघमोडे यांच्या हस्ते करण्यात आली. यावेळी ते बोलत होते. पुढे बोलताना सपोनि वाघमोडे म्हणाले की, शहरात व ग्रामीण भागात गणेशोत्सवाच्या काळात सामाजिक सलोखा अबाधित राहावा. उत्सव उत्साहाने साजरा व्हावा यासाठी सर्वांनी एकत्रित यावे. हा उद्देश या उत्सवाचा असतो. पोलिस ठाण्याकडून देण्यात येणारे पारितोषिक हे नि:पक्षपणे दिले जाणार असून स्वंयसेवकानी मुर्ती व मंडपाची काळजी घ्यावी. असे आवाहन ही त्यांनी केले. कार्यक्रमास धनंजय कुलकर्णी, संजय कोरडे, सागर चाळक, पवन अंधारे, शुभम अंधारे, अनंत कोकीळ, पोलीस नाईक बाळासाहेब अहंकारे यांच्यासह पदाधिकारी व नागरिक उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...