आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ग्रा.पं.चा:वाळू लिलावास 45 ग्रा.पं.चा विराेध;  मनपरिवर्तनासाठी प्रशासनाचे प्रयत्न

रवी उबाळे | बीडएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

जिल्ह्यात मागील वर्षी २०२०-२१ मध्ये ९२ वाळू घाटांसाठी प्रस्ताव आले हाेते. परंतु, ३२ ग्रामपंचायतींनी ठरावांद्वारे लिलावासाठी नकार दर्शविला हाेता. तरीही चार तालुक्यांमधील २२ वाळू घाटांमधून मागील वर्षी सव्वादोन लाख ब्रास वाळूतून १५ कोटींची उलाढाल झाली. या वर्षीदेखील वाळूघाटांसंदर्भात ४५ ग्रामपंचायतींच्या सभेतून ठराव नकारार्थी आलेत. परंतु, या ग्रामपंचायतींच्या मनपरिवर्तनासाठी जिल्हाधिकारी राधाबिनाेद शर्मा यांनी उपविभागीय अधिकाऱ्यांना निर्देश दिले असून यंदा दिवाळीआधी वाळू घाटांचे लिलाव होण्याची शक्यता आहे.

जिल्ह्यामधील वाळू घाटांचे सर्वेक्षण सुरू आहे. दरम्यान, माजलगाव, गेवराई आणि परळी या तालुक्यांतील ४५ ग्रामपंचायतींनी सभा घेतली असता ठराव नकारार्थी आलेले आहेत. त्या अहवालानुसार तिन्ही तालुक्यातील उपविभागीय अधिकाऱ्यांनी संबंधित गाव पातळीवर वाळूगट सर्वेक्षण करताना शासन निर्याननुसार वाळूगटाचे क्षेत्र सर्वसाधारणपणे ५ हेक्टर असावे, वाळू उत्खनन, अंमलबजावणी व देखरेख मार्गदर्शक तत्वे पर्यावरण, वन व हवामानबदल जानेवारी २०२० मधील ४.१ के नुसार एका वाळूगटापासून दुसऱ्या वाळूगटाचे अंतर हे ५०० मीटर पेक्षा जास्त असावे. याची स्वतः उपविभागीय अधिकाऱ्यांनी खात्री करावी.

वाळूगटांचे प्रस्ताव सादर करताना सदर वाळूगटांच्या ग्रामपंचायतींचे ग्रामसभा ठरावासाठी मनपरिवर्तन करण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेत. आयुक्तांनी दिल्या सूचना: तालुक्यातील उपविभागीय अधिकारी, तहसीलदार यांनी ४५ वाळू घाटासंबंधी संयुक्त वाळूघाटा लिलावाच्या अनुषंगाने विशेष ग्रामसभा आयोजित करावी. ग्रामसभांचे चित्रीकरण करावे. वाळूघाट लिलाव घेण्याच्या अनुषंगाने सकारात्मक चर्चा ग्रामसभेत करावी व वाळूघाट लिलाव न झाल्यास व वाळूघाटांतून वाळू चोरी झाल्यास ग्रामपंचायतीला जबाबदार धरून निमयानुसार कार्यवाही करण्यात येईल. या बाबतही ग्रामसभेमध्ये चर्चा करावी. एकूणच ठराव व आहवल देण्याच्या सूचना विभागीय आयुक्त केंद्रेकर यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिल्यात.

अवजड वाहनांमुळे रस्ते, पाइपलाइनचेही होते नुकसान
वाळू घाट लिलावसंदर्भात गंगावाडीत तहसीलदारांच्या उपस्थित ग्रामसभा झाली हाेती. ग्रामपंचायतीसह सर्व ग्रामस्थांनी वाळू लिलावास विरोध केला. या अगोदरच्या लिलाव झाले. मात्र ग्रामपंचायतीला एक रुपयाही मिळाला नाही, तर ४५ लाख रुपये आमचे थकीत असून अवजड वाहनांमुळे गावाचे रस्ते, शेतकऱ्यांच्या पाइपलाइनचे नुकसान होत असल्याने आमचा यासाठी एकमुखी विरोध आहे. -भास्कर हातगळे, सरपंच, गंगावाडी, ता. गेवराई

आयुक्तांना एकत्रित अहवाल पाठवणार
जिल्ह्यातील वाळू घाटासंदर्भात विभागीय आयुक्तांनी दिलेल्या सूचनेनुसार संबंधित ग्रामपंचायतींची ठरावासंदर्भात बैठक घेऊन कार्यवाही करण्याचे निर्देश उपविभागीय अधिकाऱ्यांना दिलेले आहेत. त्यांचा एकत्रित अहवाल विभागीय आयुक्तांना पाठवला जाईल. -राधाबिनोद शर्मा, जिल्हाधिकारी, बीड.

नुकसान होत असल्याने विरोध
गोदावरी नदीपात्रातून होऊ घातलेल्या वाळू लिलावास सावळेश्वर येथे ३१ आॅगस्ट २०२२ तहसीलदार सचिन खाडे यांनी ग्रामसभेत ग्रामस्थ व ग्रामपंचायतीने एकमुखी विरोध केला. वाळूमुळे गावात नेहमी भांडण-तंटे होतात. जेसीबी, पाेकलेन, बोटी, केनीद्वारे अवैध उपशामुळे पर्यावरणासह रस्ते व शेतकऱ्यांचेही नुकसान होते

बातम्या आणखी आहेत...