आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

​​​​​​​आजाराचा शिरकाव:दोन जनावरांना ‘लंपी’ची बाधा, जिल्ह्यात बाजार भरण्यावर निर्बंध; जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आदेश

बीडएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

जिल्ह्यात धसवाडी (ता. अंबाजोगाई) येथे जनावरांना होणाऱ्या लंपी स्कीन हा संसर्गजन्य आजार जिल्हाभरातील जनावरांमध्ये पसरू नये, यासाठी अंबाजोगाई, परळी, आष्टी, शिरूर कासार, पाटोदा या तालुक्यातील जनावरांचे बाजार भरवण्यास स्थगिती देण्यात आली आहे. जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा यांनी तसे शुक्रवारी आदेश काढले आहेत.

जिल्ह्यात मोठ्या जनावरांत (गोवर्गीय व म्हैसवर्गीय) मध्ये लंपी स्कीन या विषाणुजन्य रोगाची लागण झाल्याचे निदर्शनास आले आहे. धसवाडी (ता. अंबाजोगाई) येथे लंपी स्कीन या रोगाचे जनावरे आढळून आलेत. तसा अहवाल सहआयुक्त पशुसंवर्धन रोग अन्वेषण विभाग यांनी दिला आहे. त्या अनुषंगाने पशुसंवर्धन आयुक्त सत्येंद्र प्रताप सिंग यांनी जिल्हाधिकारी शर्मा यांच्याशी चर्चा करून रोग नियंत्रणाच्या सूचना दिल्यात.

जिल्हाधिकाऱ्यांनी जि.प चे. सीइओ अजित पवार, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी वासुदेव सोळंके, सर्व उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, गटविकास अधिकारी, जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त एच. पी. बोयाळे, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी विजय देशमुख यांची बैठक घेत आढावा घेऊन सूचना दिल्यात.

...तर तातडीने संपर्क साधा
आपल्या गावात किंवा परिसरात या रोगाचे रुग्ण आढळून आल्यास तातडीने दवाखाना किंवा ग्रामपंचायतीशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा परिषदेचे जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी विजय देशमुख यांनी केले.

बाधित जनावरांवर उपचार करत काळजी घ्या
बाधित पशुधनाच्या अंगावर ४० मिली नीम तेल व करंज तेल सम प्रमाणात १० लिटर पाण्यात साबणाच्या भुकटी सोबत द्रावण करून लावावे. डास,माशा गोचीड चिलटे निर्मूलनासाठी सायफारमेथ्रीन, डेल्टामेथ्रीन किंवा इतर कीटकनाशके उदाहरण इथर २० टक्के क्लोरोफार्म फोर्मालीन १ टक्का फेनोल, सोडियम हायपोक्लोराईट, आयोडीन कंपाऊंड, आणि अमोनिया कंपाऊंडची गोठ्यात व परिसरात फवारणी करावी.

बातम्या आणखी आहेत...