आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आंदोलन‎:राष्ट्रवादी महिला आघाडीकडून निवेदन देताना पदाधिकारी; अजित पवार यांना भाषण करू न‎ दिल्याने राष्ट्रवादीकडून आंदोलन‎

बीड‎12 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते‎ देहूतील संत तुकाराम महाराज‎ शिळा मंदिर लोकार्पण सोहळा पार‎ पडला. या कार्यक्रमात राज्याचे‎ उपमुख्यमंत्री अजित पवार हे देखील‎ व्यासपीठावर उपस्थित होते. मात्र‎ त्यांना भाषणाची संधीच देण्यात‎ आली नाही या बाबत राष्ट्रवादी‎ काँग्रेस महिला आघाडी‎ बीडच्यावतीने जिल्हा सचिव‎ गुलरुखजहिन शेख यांनी‎ जिल्हाधिकारी यांना निवेदन देवून‎ भाजपाच्या पदाधिकाऱ्यांनी दिलेल्या‎ या वागणूकीचा राष्ट्रवादी काँग्रेस‎ महिला आघाडीच्यावतीने जाहीर‎ निषेध करण्यात आला.‎

जिल्हाधिकारी यांना दिलेल्या‎ निवेदनात राष्ट्रवादी काँग्रेसच्या‎ महिला जिल्हा सचिव शेख गुलरुख‎ यांनी म्हटले आहे की, े संतश्रेष्ठ‎ तुकाराम महाराजांच्या शिळा‎ मंदिराचे लोकार्पण करण्यात आले.‎ यावेळी उपमुख्यमंत्री अजितदादा‎ पवार, विरोधी पक्षनेते देवेंद्र‎ फडणवीस, चंद्रकांत पाटील, देहू‎ मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष नितीन महाराज‎ मोरे, आळंदी देवस्थानचे योगेश‎ देसाई, पंढरपूर देवस्थानचे उपाध्यक्ष‎ गहिनीनाथ महाराज अवसरे‎ यांच्यासह आदी मान्यवरांची‎ उपस्थिती होती.

या कार्यक्रमात‎ राज्याचे उपमुख्यमंत्री अजितपवार‎ यांना बोलू न दिल्याने महाराष्ट्राचा‎ अपमान झाला आहे. जिल्हाधिकारी‎ कार्यालयासमोर राष्ट्रवादी काँग्रेस‎ महिला आघाडीच्यावतीने जिल्हा‎ सचिव यांच्या नेतृत्वाखाली गुलरुख‎ शेख निषेध आंदोलन करण्यात‎ आले. यावेळी प्रदेश उपाध्यक्ष‎ कमल निंबाळकर, ओबीसी सेलच्या‎ प्रदेश सचिव मिनाक्षी देवकते, मंगल‎ जगताप, जेबा शेख, सय्यद‎ शकीला, तब्बसुम आंबेकर, अनिता‎ वाघमारे, वनिता चाळक, पल्लवी‎ सारूक, रेहाना पठाण आदींची‎ उपस्थिती होती. यावेळी महिला‎ कायर्कर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी‎ करुन लक्ष वेधले.‎

बातम्या आणखी आहेत...