आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:अधिकारी-कर्मचाऱ्यांनी कामांची गती वाढवावी; आमदार बाळासाहेब आजबे यांनी तालुक्यातील सर्व यंत्रणेचा घेतला आढावा

आष्टी19 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

गेल्या दोन-अडीच वर्षांत कुणाचेच कामे झाले नाही कारण कोरोनाचे संकट होते. पण आता सगळ्या कार्यालयीन प्रमुखांनी जनतेची कामे व्यवस्थीतपणे करावीत विशेषता तहसील कार्यालय, पंचायत समिती व पोलिस ठाणे या विभागांकडेच सर्वसामान्य जनतेची जास्त कामे असतात. पंचायत समितीमध्ये जो अनागोंदी कारभार चालला आहे तो अत्यंत चुकीचा असून या कारभाराच्या अनेक तक्रारी आल्या आहेत. पण जर आशा तक्रारी व जनतेची लूट होत असेल तर आपल्याला हे मान्य नाही. तुम्ही तुमचा कारभार सुधारा अन् कारभार सुधारत नसाल तर आष्टीतून बदली करून निघून जावे. आता जर परत सर्वसामान्य जनतेची ओरड आली आणि अधिकाऱ्यांनी कामात हालगर्जीपणा केला तर खपववून घेतला जाणार नाही, असा इशारा आ. बाळासाहेब आजबे यांनी या वेळी दिला.

आष्टी तहसील कार्यालयात महाराष्ट्र दिनानिमित्त शासकीय ध्वजारोहण आमदार बाळासाहेब आजबे यांच्या हस्ते करण्यात आले. ध्वजारोहण झाल्यानंतर तहसिल सभागृहात तालुक्यातील ४०८ निराधारांना अनुदान सुरू करण्याचे प्रमाणपत्र आ.आजबे यांच्या हस्ते प्रारूप लाभार्थींना वाटप करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. यावेळी तहसीलदार विनोद गुंड्डमवार, गटविकास अधिकारी सुधाकर मुंडे, तालुका कृषी अधिकारी गोरख तरटे, राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष अण्णासाहेब चौधरी, जिल्हा परिषद सदस्य सतीश शिंदे, सुनील नाथ, शिवाजी नाकाडे, ज्येष्ठ पत्रकार प्रफुल्ल सहस्रबुद्धे, उत्तम बोडखे, पोलिस निरीक्षक विजय देशमुख, पोलिस सहायक निरीक्षक भाऊसाहेब गोसावी, पोलिस उपनिरीक्षक प्रमोद काळे उपस्थित होते.

अधिकाऱ्यांच्या कामात हस्तक्षेप करणार नाही : मतदारसंघात अधिकाऱ्यांनी त्यांच्या नियमात कामे करावीत त्यांना आजपर्यंत आपण चुकीची कामे सांगितले नाहीत अन् सांगणारही नाही. पण जर अधिकारी कामच करत नसेल तर त्यांची गय केली जाणार नाही, असेही आ. आजबे यांनी सांगितले.

ग्रामसेवक, कृषी सहायक यांनी गावातच थांबावे
जर ग्रामसेवक, तलाठी, कृषी सहायक व वायरमन यांनी आपल्या कर्तव्याच्या ठिकाणी थांबले तर बरेच कामे मार्गी लागतील. पण हे अधिकारी ग्राउंड लेव्हलवर न जाता कारभार हाकतात याही तक्रारी आपल्याकडे प्राप्त झाल्या आहेत. जर यांचा कारभार नाही सुधारला तर १५ ऑगस्ट रोजी त्याचा सत्कार करणार असल्याचे आजबे यांनी जाहीर केले.

सर्व अधिकाऱ्यांना आता योग्य त्या सूचना देणार!
तहसील कार्यालयांसह सर्व कार्यालयीन प्रमुखांना योग्य त्या सूचना देऊन कामात पारदर्शकपणा आणण्यात येईल. त्यासाठी सर्व कार्यालयीन प्रमुख अधिकाऱ्यांच्या बैठका घेण्यात येतील. सर्वसामान्य जनतेची कोणतीच कामे अडणार नाही यासाठी सर्व अधिकाऱ्यांना योग्य त्या सूचना देणार आहोत. -विनोद गुंड्डमवार, तहसीलदार, आष्टी

बातम्या आणखी आहेत...