आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पोलिस पाटलांच्या 1600 रिक्त:पोलिस पाटील संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी‎ मानले माजी मंत्री क्षीरसागर यांचे आभार‎

बीडएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

जिल्ह्यात पोलिस पाटलांच्या १६०० रिक्त‎ जागा असून त्यापैकी १३४ पोलिस पाटील कार्यरत‎ आहेत. ही बाब संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी माजी‎ मंत्री जयदत्त क्षीरसागर यांची भेट घेऊन याबाबतीत‎ आपण पुढाकार घ्यावा अशी विनंती केली होती‎ त्यानुसार माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी‎ जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन या जागा तत्काळ‎ भरण्याची आग्रही मागणी केली. यानंतर‎ जिल्हाधिकाऱ्यांनी जागा भरण्याची प्रक्रिया तत्काळ‎ सुरू केली.

याबद्दल पोलिस पाटील संघटनेचे‎ राज्याध्यक्ष बाळासाहेब शिंदे पाटील, दादा पाटील‎ काळभोर बीड जिल्हाध्यक्ष अंगद मोरे पाटील, पुणे‎ जिल्हा प्रसिद्धी प्रमुख जयसिंग भंडारे, नानासाहेब‎ काकडे पाटील, बेदरकर पाटील, शिवशंकर शिंदे,‎ श्रीकृष्ण सोळुंके, अंगद गोरे यांनी समाधान व्यक्त‎ करून आभार मानले. तीन महिन्यात पोलिस पाटील‎ पदांच्या सर्व रिक्त जागा भरल्या जाणार आहेत.‎

बातम्या आणखी आहेत...