आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

बीड:महिलांच्या शासकीय व्हॉट्सअॅप ग्रुपवरअधिकाऱ्याने टाकले स्वत:चे नग्न फोटो; बीडच्या ‘महिला व बालविकास’च्या प्रकल्प अधिकाऱ्याचा प्रताप

बीड3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • या अधिकाऱ्याने 2 मे 2019 रोजी बीड शहरातील एक महिला अंगणवाडी सेविकेचा विनयभंग केला होता

बीड आयसीडीएस अर्बन या अंगणवाडी मदतनीस, सेविका कर्मचाऱ्यांच्या शासकीय व्हाॅट्सअॅप ग्रुपवर स्वतःचे अंघोळ करतानाचे नग्न फोटो पोस्ट करण्याचा प्रताप शहरी भागासाठी नियुक्त महिला व बालविकास प्रकल्प अधिकारी जगदीश मोरे याने केला आहे. या प्रकरणी अंगणवाडी सेविकांनी जिल्हाधिकाऱ्यांसह पोलिसांत तक्रार दाखल केली. बुधवारी त्याच्यावर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाली. दरम्यान, त्याला निलंबित केल्याची घोषणा महिला व बालविकासमंत्री यशोमती ठाकूर यांनी केली आहे.

मोरेवर विनयभंगाचा गुन्हा दाखल करून तडकाफडकी निलंबन करावे, अशी मागणी महिलांनी केली. महाराष्ट्र राज्य धनश्री सेविका, मदतनीस, अंगणवाडी कर्मचारी संघटनेच्या जिल्हाध्यक्षा संघमित्रा जयवंत शेजवळ यांनी थेट मोरेच्या विरोधात तक्रार दिली आहे.

वर्षभरापूर्वीच विनयभंगाचा गुन्हा झाला होता दाखल

जगदीश मोरेने २ मे २०१९ रोजी बीड शहरातील एक महिला अंगणवाडी सेविकेचा विनयभंग केला होता. या प्रकरणी त्याच्याविरोधात शिवाजीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्यात त्याने जामीन मिळवला होता. त्यानंतर मोरेने प्रशासकीय न्यायाधिकरणात अपील करून पुन्हा बीडला बदली करून घेतली होती.