आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आदेश:लाचखोर उपनिरीक्षकासह अंमलदार निलंबित ; ठाणे प्रमुखांची डीवायएसपींकडे चौकशी

बीड2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

विनयभंगाच्या गुन्ह्यात मदत करण्यासाठी ३० हजारांची लाच मागून स्विकारणाऱ्या पोलिस उपनिरीक्षकासह अंमलदाराला सोमवारी एसीबीने गजाआड केले होते. दरम्यान, मंगळवारी एसपी नंदकुमार ठाकूर यांनी दोघांनाही तडकाफडकी निलंबित केले. तर, ठाणे प्रमुखांच्या चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत.

विनयभंगाच्या गुन्ह्यात मदत करुन हा गुन्हा बी फायनल करण्यासाठी शिवाजीनगर पोलिस ठाण्यातील पोलिस उपनिरीक्षक राजू गायकवाडसह पोलिस अंमलदार विकास यमगर या दोघांना औरंगाबादच्या लाचलुचत प्रतिबंधक पथकाने सोमवारी सायंकाळी गजाआड केले होते. या प्रकरणी त्यांच्या विरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. याचा अहवाल पोलिस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांना पाठवला गेला होता. मंगळवारी ठाकूर यांनी दोघांनाही सेवेतून निलंबीत केले.तर, या प्रकरणात ठाणे प्रमुख पीआय केतन राठोड यांची चौकशी करण्यात येणार आहे. बीडचे उपविभागीय पोलिस अधिकारी संतोष वाळके यांच्याकडे ही चौकशी दिली असून आठवडाभरात अहवाल देण्यास सांगितले असल्याची माहिती पोलिस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांनी दिली.

बातम्या आणखी आहेत...