आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिविगाळ:जुना वाद, माजलगावात दोघांवर चाकूने हल्ला ; माजलगाव शहर पोलिसांत दोन जणांविरोधात गुन्हा नोंद

बीड6 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

जुन्या वादाची कुरापत काढून माजलगावात दोन तरुणांवर चाकूने हल्ला करण्यात आल्याची घटना घडली. याप्रकरणी माजलगाव शहर पोलिसांत दोन जणांविरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. अमोल बबनराव गावडे (२६, रा. पंचशीलनगर) या तरुणाने या प्रकरणी पोलिसांत तक्रार दिली. त्याच्या तक्रारीनुसार, विक्की शरणांगत (रा. इंदिरानगर) आणि प्रतिक भोजने (रा. केसापूरी कॅम्प) या दोघांशी त्याचा जुना वाद होता. मंगळवारी या दोघांनी जुन्या वादाची कुरापत काढून अमोल याला शिविगाळ केली. त्याचा पाठलाग केला. यावेळी सोबत त्याचा मित्र शुभम वाल्मिकी हा सुद्धा होता. एका घरात ते दोघे लपले होते. विक्की व प्रतिक यांनी घरात घुसून अमोल व शुभम यांच्यावर चाकूने हल्ला केला. यात दोघेही जखमी झाले. या प्ररकरणी विक्की शरणांगत व प्रतिक भोजने यांच्या विरोधात माजलगाव शहर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

बातम्या आणखी आहेत...