आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

खेळखंडोबा:पूर्वीचे खेळ, खेळाडू नामशेष;‎ नवे खेळ खेळखंडोबा करणारे

शिरुरकासार‎4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

कृष्ण काळातील खेळ व सध्या‎ खेळले जाणारे खेळ यांचं महत्त्व‎ पटवून सांगितलं पूर्वीचे खेळ‎ खेळणारे देखील नामशेष झाले‎ असून सध्या खेळले जाणारे खेळ हे‎ खेळ खंडोबा करणारे आहे अशी‎ भावना जनार्दन महाराज शिंदे यांनी‎ आपल्या कीर्तनात व्यक्त केली.‎ दत्तजयंती निमित्त क्षेत्र मच्छिंद्र‎ नाथ गडावर शनिवार ३‎ डिसेंबरपासून आयोजित गुरुचरित्र‎ सामूहिक पारायण सोहळ्याची‎ सांगता गुरुवार ८ डिसेंबर रोजी‎ स्वामी जनार्दन महाराज यांच्या‎ काल्याच्या कीर्तनाने झाली. या‎ सोहळ्याला गडाच्या भक्तांनी‎ मोठ्या प्रमाणावर उपस्थिती लावली‎ होती.

वैकुंठवासी निगमानंद महाराज‎ यांनी श्री क्षेत्र मच्छिंद्र नाथ गडावर‎ दत्त जयंती उत्सव साजरा करण्याची‎ परंपरा गेली कित्येक वर्षापासून‎ अखंड सुरू आहे गडाचे महंत‎ स्वामी जनार्दन महाराज यांनी ही‎ परंपरा पुढे अद्यावत ठेवत यावर्षी‎ दत्त जयंती निमित्ताने गुरुचरित्र‎ सामूहिक पारायण सोहळ्याचे‎ आयोजन करून सोहळा पार‎ पडला. दत्त जयंती निमित्ताने‎ भागवताचार्य रामेश्वर महाराज‎ शास्त्री यांची कीर्तन सेवा ठेवून दत्त‎ जयंती उत्सव साजरा केला. गुरुवारी‎ गुरुचरित्र ग्रंथांची भव्य मिरवणूक‎ काढून संस्थानावरील दत्त‎ मंदिरासमोर जनार्दन महाराज यांच्या‎ काल्याच्या कीर्तनाने गुरुचरित्र‎ पारायण सोहळ्याची सांगता झाली.‎ कीर्तनानंतर डॉ. संतोष धूत‎ यांच्यामार्फत महाप्रसादाचे आयोजन‎ करण्यात आले होते. निमगाव‎ मायंबा गावालगत असलेल्या‎ गावातील हजारो भाविकांनी या‎ सोहळ्याचा लाभ घेतला.‎

बातम्या आणखी आहेत...