आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष ‎:ओंकार पाटील विद्यालयासह‎ गावाचे नाव उज्ज्वल करणार‎

लिंबागणेश‎एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

ओंकार पाटील हा एक आदर्श‎ विद्यार्थी असून मातापित्यांच्या‎ संस्कारात घडलेला मुलगा आहे.‎ तो जर्मनीला जात असुन आपल्या‎ विद्यालयासह गावाचे, राज्याचे नाव‎ उज्वल करेल असे प्रतिपादन‎ रामकृष्ण रंधवे बापू यांनी येथे केले.‎ बीड तालुक्यातील लिंबागणेश‎ येथील येथील ओंकार रमेश पाटील‎ हा पदव्युत्तर शिक्षणासाठी जर्मनीला‎ नुकताच रवाना झाला. जर्मनी‎ येथील विद्यापीठातून रिनेव्हेबल‎ एनर्जी या विषयावर पदव्युत्तर एम‎ एस पूर्ण करणार आहे. जर्मनीला‎ रवाना होण्यापूर्वी लिंबागणेश‎ येथील भालचंद्र माध्यमिक व उच्च‎ माध्यमिक विद्यालय व ग्रामस्थांच्या‎ वतीने ओंकारचा सत्कार करण्यात‎ आला.‎

यावेळी रंधवे अध्यक्षस्थानावरून‎ बोलत होते. व्यासपीठावर प्रमुख‎ पाहुणे म्हणून जिल्हा काँग्रेसचे‎ अध्यक्ष राजसाहेब‎ देशमुख,उपाध्यक्ष नवनाथ थोटे,‎ काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल सोनवणे,‎ नवनाथ नवसे पाटील, ओंकारचे‎ वडील रमेश पाटील, केजचे‎ नगरसेवक पशुपती दांगट, सुजित‎ देशपांडे, डॉ.सुधाकर‎ आंधळे,बाबाराजे देशमुख, शिक्षक‎ नेते उत्तमराव पवार, बबनराव‎ सूर्यवंशी, बिभीषण रसाळ, सरपंच‎ स्वप्निल गलधर, राहुल जाधव,‎ गणपत तागड, मोहनराव कोठुळे,‎ सोमा गायकवाड, प्राचार्य सावंत,‎ सुपरवायझर हावळे,माजी प्राचार्य‎ दत्तात्रय मानकर, माजी प्राचार्य यु.‎ एस. बांगर आदी उपस्थित होते. ‎ ‎ सूत्रसंचालन मोरे तर प्रास्ताविक ‎ ‎ हावळे यांनी केले.‎ जर्मनी येथे ओंकार पाटील जात‎ आहे परंतु पुढील शिक्षण पूर्ण‎ झाल्यानंतर भारतात येऊन आपल्या‎ ज्ञानाचा आपल्या देशातील‎ लोकांना फायदा होईल यासाठी‎ निश्चीत प्रयत्न करेल असे यावेळी‎ राजेसाहेब देशमुख यांनी सांगितले.‎जर्मनी विद्यापीठातून रिनेव्हेबल एनर्जी विषयात पदव्युत्तर शिक्षणासाठी‎ जाणाऱ्या ओंकार पाटीलचा ग्रामस्थांच्या वतीने सत्कार करण्यात आला.‎

मी गावाला विसरणार नाही‎
मी गावाला देशाला विसरणार नाही, विद्यार्थी मित्रांनी चांगला अभ्यास‎ करून माझ्याप्रमाणेच परदेशी शिक्षण घेऊन आपल्या देशाची सेवा‎ करावी. कोणतेही गोष्ट अशक्य नसते फक्त प्रेरणांची गरज असते.‎ अपारंपारिक ऊर्जा स्त्रोत यासाठी आपल्या देशाला विजेची कधीही‎ कमतरता पडणार नाही यासाठी मी प्रयत्न करेल असे ओंकार पाटील‎ याने सांगीतले.‎

बातम्या आणखी आहेत...