आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिक्षणासाठी दत्तक ‎:आरोग्यमंत्री सावंत यांच्या वतीने‎ स्व. संजय सावंतांच्या कुटुंबास मदत‎

बीड‎22 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

शिवक्रांती संघटनेचे अध्यक्ष तथा मराठा क्रांती ‎ ‎ मोर्चाचे राज्य समन्वयक संजय सावंत यांचे ५‎ मार्च रोजी निधन झाले. स्व.सावंत यांनी मराठा ‎ ‎ आरक्षणासाठी कायमच पुढाकार घेतला होता. ‎ ‎ सावंत यांच्या कुटुंबियांना आरोग्यमंत्री तानाजी ‎ ‎ सावंत यांनी तीन लाख रुपयांची आर्थिक मदत‎ दिली असून त्यांच्या मुलांना शिक्षणासाठी दत्तक ‎ ‎घेतले आहे.

महेश डोंगरे व शिवसेनेचे‎ जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडे यांच्या हस्ते स्व.‎ सावंत यांच्या कुटुंबियांना मदतीचा धनादेश‎ देण्यात आला.‎ संजय सावंत यांनी त्यांनी मराठा चळवळीत‎ मोठे योगदान दिले. तसेच त्यांनी मराठा‎ आरक्षणावर सतत काम केले. एका छोट्याश्या‎ खेडे गावातून त्यांनी मराठा आरक्षणाची‎ मुहूर्तमेढ रोवली. त्यांच्या अकाली निधनाने‎ समाजाची हानी झाली अशा शब्दांत महेश डोंगरे‎ यांनी शोक व्यक्त केला.

त्यांच्या कुटुंबासाठी‎ रोख स्वरूपात तीन लाख रुपये आर्थिक मदत व‎ स्व. संजय सावंत यांच्या मुलांना शिक्षणासाठी‎ ‎ ‎आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांनी दत्तक घेतले‎ आहे. स्व. संजय सावंत यांच्या मुलांना‎ नोकरीसाठी ही भविष्यात मदत करणार आहोत,‎ असा शब्द डोंगरे यांनी दिला. यावेळी शिवसेना‎ जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडे म्हणाले, की‎ स्व.संजय सावंत यांच्या कुटुंबाला आधार‎ देण्याचे काम मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व मंत्री‎ तानाजी सावंत यांच्या माध्यमातून करू.‎

बातम्या आणखी आहेत...