आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गैरप्रकार:अंबाजोगाई शहरासह राष्ट्रीय महामार्गावर नियम धाब्यावर; दंड रक्कम गुलदस्त्यात

अंबाजोगाईएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाचा नाकर्तेपणा; नागरिक त्रस्त

अंबाजोगाई येथील उपप्रादेशिक परिवहन अधिका-यांच्या नाकर्तेपणाचा वाईट परिणाम थेट शहरातील व राष्ट्रीय महामार्गावरील वाहतुकीवर होत आहे. सर्व वाहतूक नियम धाब्यावर बसवून वाहनधारक वाहने चालवत असतांना दिसत आहेत.कोणत्या ठिकाणी कुठल्या कारणावरून कारवाई करण्यात आली?किती रूपये दंड वसूल करण्यात आला इत्यादी बाबत उपप्रादेशिक परिवहन अधिकारी दत्तात्रय सांगोलकर सांगण्यास टाळाटाळ करून वेळ मारून नेत आहेत, त्यामुळे दंडाची रक्कम काेणत्या गुलदस्त्यात जात आहे, अशी उलट सुलट चर्चा सुरू आहे.

अंबाजोगाई शहराची लोकसंख्या एक लाखाहून अधिक आहे.वाहनांची संख्या शहराच्या विस्ताराबरोबर दिवसेंदिवस वाढली आहे.शाळा, महाविद्यालयात जाणा-या विद्यार्थी व नागरिकांची शहरात मोठ्या प्रमाणावर गर्दी झाली आहे. विना परवाना, ट्रीपल सीट,विदाऊट पीयुसी, विना कागदपत्रे वाहने चालवने,रॉन्ग साईड वाहने चालवणे , वेग मर्यादा वाढवून सुसाट गाड्या पळवणे, वाहनांची कालमर्यादा संपली तरीही बिनदिक्कत रस्त्यावरून वाहने चालवणे असे अनेक गंभीर कारणे असतांनाही उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून कुठलीही कारवाई केली जात नाही. वाहनधारकांना ही परिवहन अधिकाऱ्याची भीती उरलेली नाही. अंबाजोगाई ते लातूर या वीस किलोमीटर अंतराच्या राष्ट्रीय महामार्गावर गेल्या दोन वर्षांमध्ये अपघात होऊन ५८ जणांचा बळी गेला आहे. अरुंद रस्ता हे एक कारण असले तरी सुसाट वेगाने धावनारी वाहने व ड्रंक अँड ड्राईव्ह हे सुद्धा मुख्य कारणे आहेत.

मनुष्यबळाचा अभाव तरी कारवायचे सत्र सुरू आहे
●आमच्याकडे मनुष्यबळ कमी आहे. काही ठिकाणी आम्ही कारवाया केल्या आहेत. आणखी काय काय करता येईल यासाठी आम्ही प्रयत्न करतो आहोत. अशी माहिती उपप्रादेशिक परिवहन अधिकारी दत्तात्रय सांगोलकर त्यांनी दिली.

बातम्या आणखी आहेत...