आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Aurangabad
  • Beed
  • On The Occasion Of Pandit's Birthday; Distribution Of Spectacles To 17 Patients Who Underwent Successful Surgery In The Third Phase At The Sub District Hospital |marathi News

दिव्य मराठी विशेष:पंडित यांच्या वाढदिवसानिमित्त ; उपजिल्हा रुग्णालयात तिसऱ्या टप्प्यात यशस्वी शस्त्रक्रिया झालेल्या 17 रुग्णांना चष्मे वाटप

गेवराईएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

उपजिल्हा रुग्णालयात तिसऱ्या टप्यात यशस्वी शस्त्रक्रिया झालेल्या १७ रुग्णांना रणवीर अमरसिंह पंडित यांच्या हस्ते काळ्या चष्म्यांचे वाटप करण्यात आले. माजी आमदार अमरसिंह पंडित यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित केलेल्या मोफत नेत्र तपासणी आणि शस्त्रक्रिया शिबीरामधील तपासणी झालेल्या पात्र रुग्णांना चष्मे वाटप करण्यात आले. यावेळी उपजिल्हा रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. महादेव चिंचोळे, जयभवानी कारखान्याचे उपाध्यक्ष जगन्नाथ शिंदे, माजी सभापती कुमारराव ढाकणे, सुभाष मस्के, दत्ताभाऊ दाभाडे, राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष अक्षय पवार, राष्ट्रवादी सोशल मिडियाचे तालुकाध्यक्ष संदिप मडके, डॉ.काळे, डॉ. मांडवे आदी मान्यवर उपस्थित होते.

माजी आमदार अमरसिंह पंडित यांचा वाढदिवसाच्या निमित्ताने मोफत नेत्र तपसणी व शस्त्रक्रिया शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराला मोठा प्रतिसाद मिळाला. मोफत नेत्र तपासणी नंतर शस्त्रक्रियेस पात्र झालेल्या रुग्णांवर उप जिल्हा रुग्णालयात बुधवार दि. १ पासुन शस्त्रक्रिया सुरु करण्यात आल्या पहिल्या टप्या मध्ये १४ रुग्णांवर यशस्वी शस्त्रक्रिया पुर्ण झाल्या. सोमवार दि. ६ जुन रोजी तिसऱ्या टप्प्यात १७ रुग्णांवर यशस्वी शस्त्रक्रिया पुर्ण झाल्या. या रुग्णांना रणवीर पंडित यांच्या हस्ते काळ्या चष्म्यांचे वाटप करण्यात आले. यावेळी रुग्णांनी आभार व्यक्त करुन अमरसिंह पंडित आणि शिवछत्र परिवाराला आशिर्वाद दिले. रणवीर पंडित यांनी सर्व रुग्णांची आस्थेवाईकपणे विचारपूस केली. याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते, डॉक्टर्स, आरोग्य कर्मचारी, रुग्ण उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...