आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उपक्रम:शिवराज्याभिषेक सोहळ्यानिमित्त ; शेतकऱ्यांना मोफत बी-बियाणे वाटपाचा उपक्रम

बीडएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

शिवराज्याभिषेक सोहळ्यानिमित्त व शिवसेना जिल्हाप्रमुख अनिल जगताप यांच्या वाढदिवसानिमित्त शेतकर्‍यांना मोफत बि-बियाणे वाटप व जिव्हाळा बेघर निवारा केंद्रामध्ये अन्नदानाचा कार्यक्रम शिवसेना आणि विविध सामाजिक संघटनेच्या वतीने आयोजित करण्यात आला.

बीड मधाील भाजी मंडई येथे जिव्हाळा बेघर निवारा केंद्रामध्ये जाणते राजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेक सोहळा दिना निमित्त व शिवसेनेचे बीड जिल्हा प्रमुख अनिल दादा जगताप यांच्या वाढदिवसानिमित्त शिवसेना व बुलंद छावा, राष्ट्रीय छावा, संभाजी ब्रिगेड कर्मचारी संघटनेच्या वतीने शेतकर्‍यांसाठी मोफत बि-बियाणे वाटप व जिव्हाळा बेघर निवारा केंद्रातील गरजूंसाठी अन्नदानाचा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी दैनिक पार्श्वभूमी चे संपादक गंमत भंडारी, शिवसेनेचे सहसंपर्क प्रमुख बाळासाहेब अंबुरे, शिवसेनेचे जिल्हा संघटक नितीन धांडे, व्यापारी संघाचे गणेश कासट, विनोद कलंत्री, शिवसेना शहर प्रमुख सुनिल सुरवसे आदी उपस्थित होते. जगताप म्हणाले की, आज माझा वाढदिवस शेतकर्‍यांना बि-बियाणे वाटप करून व गरजूंना अन्नदान करून साजरा केला त्याबद्दल मला मनापासून खूप आनंद झाला. मी नेहमीच शेतकर्‍यांसाठी तत्पर असतो शेतकर्‍यांच्या हिताची कामे करतो. आतापर्यंत शेतकर्‍यांसाठी आंदोलने केली आहेत यामध्ये देता का जाता हे मोठे आंदोलन केले होते. त्यामुळे सरकारला कर्जमाफी करावी लागली नेहमीच शेतकर्‍यांच्या हितासाठी कार्य करत राहील असे ते यावेळी म्हणाले.

बातम्या आणखी आहेत...