आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराशिवसेनेचे जिल्हा संघटक रतन गुजर यांनी शिवसेनेच्या ५६ व्या वर्धापनदिनानिमित्त प्रभागातील ५६ ज्येष्ठ शिवसैनिकांचा सत्कार केला व जुन्या शिवसैनिकांचे कार्य काय? याविषयी माहिती विषद केली. शिवसेनेचे तालुकाप्रमुख गोरख शिंगण, नगरसेवक भैय्यासाहेब मोरे, रणजित बनसोडे, प्रकाश गोकुळे, दिनू चक्रे, प्रकाश वडमारे, बाळा तांदळे, सुरेश जगताप, संतोष आदमाने, शरद भराड, बबन पवार, शिवाजी माने, हनुमान भैरवाड यांची प्रमुख उपस्थिती होती. रतन गुजर म्हणाले की, बाळासाहेबांची शिवसेना ही लोकांच्या मुलभूत गरजा पुर्ण करण्यासाठी आहे.
शेतकरी, कष्टकरी, मराठी माणूस, हिंदुत्व यासाठी शिवसैनिकांनी प्राणपणाने कार्य केलेले आहे. शिवसेनेच्या माध्यमातून महाआरती, दिंडीचें आयोजन, शेतकरी प्रश्नांवर मोर्चा असे अनेक आंदोलने शिवसैनिकांनी हाताळली व लोकांचे प्रश्न मार्गी लावले, असेही रतन गुजर यांनी सांगितले. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांवर चालणारे शिवसैनिक यापुढेही सर्वसामान्यांच्या सेवेसाठी तत्पर राहणार आहे. त्यामुळे जनतेनेही त्यांच्या काही अडचणी असतील तर त्या मांडाव्यात, असे आवाहन गुजर यांनी केले. यावेळी इतर मान्यवरांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.