आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मदत वाटप:मंत्री अशोकराव पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त; काँग्रेसच्या वतीने पसायदान प्रकल्पात मदत वाटप

बीडएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नानाभाऊ पटोले व माजी मंत्री अशोकराव पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त बीड तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष गणेश बजगुडे यांनी पसायदान सेवा प्रकल्प ढेकनमोह (ता. जि. बीड) येथील अनाथ निराधार असलेल्या बालकांना खाऊ व मदतीचे वाटप केले. यासह कायम या प्रकल्पासोबत असल्याची ग्वाही दिली. ढेकनमोहा येथील गोवर्धन दराडे हे अनाथ, निराधार बालकांचा सांभाळ करतात.

याठिकाणी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, माजी मंत्री अशोकराव पाटील यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत खाऊचे वाटप करण्यात आले. यासह इतर आवश्यक मदतही करण्यात आले. गणेशराव बजगुडे यांनी याप्रसंगी मार्गदर्शन केले. तसेच गावेर्धन दराडे यांचे कार्य हे अतिशय कौतुकास्पद असल्याची भावना व्यक्त केली. गोवर्धन दराडे यांनी या उपक्रमाबद्दल बजगुडे यांचे आभार मानले. यावेळी काँग्रेसचे युवक विधानसभा अध्यक्ष हनुमान घोडके, अल्पसंख्यांक तालुकाध्यक्ष शेख बबलु, शेख आमेर, कृष्णा साळुंके, भगवान देवकते यांच्यासह तालुक्यातील काँग्रेसचे कार्यकर्ते, पदाधिकारी व प्रकल्पातील चिमुकल्यांची उपस्थिती होती.

बातम्या आणखी आहेत...