आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराअहमदाबादमध्ये झालेल्या ३६ व्या राष्ट्रीय क्रिडा स्पर्धेतील स्केट बोर्ड या क्रिडा प्रकारात सुवर्णपदक पटकावुन ऑलंम्पीकसाठी निवड झालेल्या परळी येथील कु.श्रध्दा गायकवाड हीचा परळी येथील लोकनेते गोपीनाथराव मुंडे नटराज रंग मंदिरात येत्या सोमवार १४ नोव्हेंबर रोजी नागरी गौरव करण्यात येणार आहे.या कार्यक्रमाच्या व्यासपीठावर राजकारणात एकमेकांचे कट्टर विरोधक बसलेले बहिण- भाऊ माजी मंत्री पंकजा मुंडे व धंनजय मुंडे हे एकत्र येणार आहेत. दोघे काय बोलतात याकडे परळीकरांचे लक्ष लागले आहे.
परळीची कन्या कु.श्रद्धा रविंद्र गायकवाडने नुकत्याच अहमदाबाद येथे झालेल्या ३६ व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत ‘स्केट बोर्ड’ या क्रीडा प्रकारात सुवर्णपदक पटकावले असुन तिची ऑलंम्पीकसाठी निवड झालेली आहे. सोमवार १४ नोव्हेंबर रोजी दुपारी ४ वाजता शहरातील लोकनेते गोपीनाथराव मुंडे नटराज रंग मंदिरात श्रध्दा गायकवाड हिचा नागरी गौरव सोहळा होणार आहे. या कार्यक्रमाच्या व्यासपीठावर राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी मंत्री आमदार धनंजय मुंडे, भाजपच्या माजी मंत्री पंकजा मुंडे यांची उपस्थीती असणार आहे.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून अप्पर पोलिस अधिक्षक अंबाजोगाई कविता नेरकर, शिवछत्रपती क्रिडा पुरस्कार प्राप्त खेळाडू डॉ.चंद्रजीत जाधव,अमेरीकेतील एम.आय.टी.विद्यापीठात निवड झालेला विद्यार्थी आकाश पोपळघट,उपजिल्हाधिकारी नम्रता चाटे,बीड जिल्हा क्रीडा अधिकारी सुहासिनी देशमुख,तहसिलदार सुरेश शेजुळ,माजी नगराध्यक्षा सरोजनी हालगे,परळी नगर पालिकचेे मुख्याधिकारी एस.ए.बोंदर,साहित्यिक प्रा.डॉ.मुकूंद राजपंखे,पोलिस निरीक्षक उमाकांत कस्तुरे,सुरेश चाटे आदी उपस्थित राहणार आहेत.
सुवर्णकन्येची सत्कार रॅली
श्रध्दा गायकवाडच्या सत्कार सोहळ्यापुर्वी तिची परळी शहरातील भिमनगर येथून सोमवारी दुपारी दोन वाजता सत्कार रॅली काढली जाणार आहे.
लेकीच्या कौतुक साेहळ्याची तयारी
परळीची लेक असलेल्या श्रध्दाच्या कौतुक सोहळ्याची सध्या परळी जय्यत तयारी सुरू असून तिच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यासाठी परळीकरांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन सुवर्णकन्या श्रद्धा गायकवाड नागरी सत्कार समितीच्या वतीने करण्यात आले आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.