आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराभारतमातेला गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी भारतीय जनता पार्टीची स्थापना झाली. गोरगरीब, कष्टकरी जनतेचे सबलीकरण करून अखंड भारताचे स्वप्न पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात पूर्ण होत आहे. आज जागतिक घडामोडीत भारत देश सक्षम व ताठ मानेने उभा आहे. संकटग्रस्त देशांना भारताच्या मदतीची अपेक्षा व्यक्त करत आहे. विश्वगुरूची भूमिका भारताने निभवावी ही अनेक विकसनशील राष्ट्रांची मानसिकता आहे. कणखर व राष्ट्राभिमानी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात भारत विश्वगुरूचे स्वप्न निश्चितच पूर्ण करेल, असा विश्वास डॉ. सुभाष जोशी यांनी व्यक्त केला.
बीड येथे भाजपच्या ४२ वर्धापन दिनानिमित्ताने भाजपा जिल्हा कार्यालयात पक्ष स्थापना दिवस साजरा करण्यात आला. यावेळी ते बोलत होते. भाजपा जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के, माजी आमदार आदिनाथराव नवले, अॅड. सत्यनारायण लोहिया, डॉ. सुभाष जोशी, अॅड. बाळासाहेब बाहेगव्हाणकर, प्रा. रामचंद्र मुळे, बाळकिसन सिकची, विजयकुमार पालसिंगणकर, गजानन जगताप, दत्ता नलावडे, शिवाजी मुंडे यांची प्रमुख उपस्थिती होती. या प्रसंगी भारतीय जनता पार्टीच्या शक्ती केंद्र प्रमुखांचा प्रतिनिधिक स्वरुपात सत्कार करण्यात आला. अध्यक्षीय भाषणात बोलताना भाजप जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के यांनी महाराष्ट्रात प्रमोद महाजन व लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांनी भारतीय जनता पार्टीचा पाया मजबूत केला. भाजपाच्या पाठीशी बहुजनांचा जनाधार उभा केला. भाजपचा इतिहास ज्वलंत व प्रेरणादायी असल्याचेही जिल्हाध्यक्ष मस्केंनी सांगितले.
आष्टी येथे भाजप स्थापना दिनानिमित्त विधान परिषद आमदार सुरेश धस यांनी आपल्या निवासस्थानापासून दुचाकी रॅली काढत शहरातील राम मंदिरात या रॅलीची सांगता केली. माजी आमदार भीमराव धोंडे यांच्या आष्टी येथील संपर्क कार्यालयात भारतीय जनता पार्टीचा वर्धापनदिन भाजपचे प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात पार पडला. यावेळी डॉ.शामाप्रसाद मुखर्जी, पंडीत दीनदयाळ उपाध्यायजी, माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी, माजी केंद्रीय मंत्री गोपीनाथराव मुंडे यांचे प्रतिमा पूजन करण्यात आले. अॅड. वाल्मीक निकाळजे, भाजपा तालुकाध्यक्ष अॅड. हनुमंतराव थोरवे, रिपाइं तालुकाध्यक्ष अशोक साळवे, भाजप बीड जिल्हा सचिव शंकरराव देशमुख, पं.स. सदस्य प्रा. दादासाहेब झांजे यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने हजर होते.
पाटोदा येथेही आमदार सुरेश धस यांच्या मार्गदर्शनाखाली भाजप स्थापना दिवस उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. यानिमित्ताने पाटोदा नगर पंचायतीसमोर पक्ष चिन्हाची रांगोळी काढण्यात आली होती. शिरूर येथेही स्थापना दिन विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला. बीड येथेही पक्ष पदाधिकाऱ्यांच्या वतीने ठिकठिकाणी विविध कार्यक्रम घेण्यात आले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.