आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नुकसान:टाकरवणमध्ये दीड एकर ऊस जळून नुकसान

टाकरवण8 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

माजलगाव तालुक्यातील टाकरवणमध्ये दीड एकर उसाला आग लागून दोन शेतकऱ्याचे मोठे नुकसान झाले. सोमवारी दुपारी ही घटना घडली. शेतकऱ्याला प्रशासनाने मदत देण्याची गरज आहे. टाकरवणमध्ये गट क्रमांक २२३ मध्ये शेतकरी छत्रभुज खुळे यांचा अर्धा एकर तर कांतीलाल पटेकर यांचा एक एकर क्षेत्रावर ऊस आहे.

सोमवारी दुपारी शेतातून गेलेल्या विद्युत खांबावर स्पार्किंग होऊन ठिणग्या पडल्याने त्यांच्या उसाला आग लागली. यात दोघांचा ऊस जळून खाक झाला. दरम्यान, उसाने पेट घेतल्यानंतर आजूबाजूच्या शेतकऱ्यांनी धाव घेत आग आटोक्यात आणली. प्रसंगावधानामुळे परिसरातील दहा हेक्टरवर असलेला ऊस या अपघातातून वाचला.

बातम्या आणखी आहेत...