आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शेतरस्ता वाद:दीडशे वर्षांपूर्वीचा वहिवाटीचा रस्ता 2 शेतकऱ्यांनी अडवला; 2 सुनावणीत प्रश्न मार्गी लावणार, तहसीलदारांची ग्वाही

आष्टी2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

तालुक्यातील पिंपळगाव घाट येथील क्षेत्रे वस्तीवर जाणारा जवळपास दीडशे वर्षांपूर्वीचा वहिवाटीचा रस्ता दोन ते तीन शेतकऱ्यांनी अडवल्याने बुधवारी (दि.११) तहसीलदार विनोद गुंड्डमवार यांनी मंडळअधिकारी, तलाठी व गावकऱ्यांच्या उपस्थितीत स्पॉट पंचनामा केला. या रस्ताचा पुढील दोन सुनावणीत प्रश्न मार्गी लावणार असल्याचे तहसीलदार विनोद गुंड्डमवार यांनी अश्वासन दिले.

पिंपळगाव घाट येथील क्षेत्रे वस्तीवर जवळपास दीडशे वर्षांपूर्वीचा वहिवाटीचा रस्ता येथील काही शेतकऱ्यांनी बंद केला होता. याबाबत तहसील कार्यालयात रस्त्यासाठी गावकऱ्यांनी अर्ज करताच बुधवारी ( दि.११) भरउन्हात तहसीलदार गुंड्डमवार, मंडळअधिकारी पांडुरंग माढेकर, तलाठी संजय दगडखैर यांच्यासह गावकऱ्यांना समवेत घेऊन रस्त्याची पाहणी केली. या रस्त्याचा पुढील दोन सुनावणीत प्रश्न मार्गी लावणार असल्याचे तहसीलदार गुंड्डमवार यांनी सांगितले.

मायबाप सरकारने आम्हाला रस्ता करून द्यावा
हा क्षेत्र वस्तीवरचा रस्ता सुरळीत सुरू होता. परंतु, काहि शेतकऱ्यांनी हा रस्ता रस्ता जेसीबीच्या सहाय्याने खोदून बंद केला. पर्यायी आम्ही न्याय मागण्यासाठी तहसीलदारांकडे अर्ज केला. आता मायबाप सरकारने आम्हाला रस्ता करून द्यावा, अशी माहिती क्षेत्र वस्तीवरील काही शेतकऱ्यांनी नाव न छापण्याच्या अटीवर दिली.

इतर अर्जांवर स्पॉट पंचनामा करावा
आष्टी तालुक्यात असे अनेक वहिवाटीचे रस्ते काही शेतकऱ्यांनी अडवले अाहेत. याबाबत तहसील कार्यालयातही मोठ्या प्रमाणावर अर्ज आलेत. पण या रस्त्याच्या प्रकरणाकडे यापूर्वीचे तहसीलदार लक्षच देत नव्हते. शेतकऱ्यांना फक्त तारखेलाच खेट्या माराव्या लागत होत्या. आता तहसीलदार गुंड्डमवार यांनी स्पॉट पंचनामे करत लक्ष घातल्याने तालुक्यातील रस्त्यांची प्रकरणे मार्गी लागतील, अशी अपेक्षा.
-कैलास दरेकर, मनसे शेतकरी संघटना, जिल्हाध्यक्ष, बीड.

याचा निर्णय तेच घेतील
हा रस्ता खूप वर्षापूर्वीचा आहे. जाणून-बुजून काही शेतकऱ्यांनी रस्ता अडवला आहे. याचा स्पॉट पंचनामा तहसीलदारांनी करून घेतला आहे. लवकरच याचा निर्णय ते दंडाधिकारी म्हणून घेतील.
-पांडूरंग माढेकर, मंडळअधिकारी, आष्टी.

बातम्या आणखी आहेत...