आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

श्रावण सोमवारी दर्शन:दीड लाख भाविकांनी घेतले प्रभू वैद्यनाथाचे दर्शन

परळी9 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

बारा ज्योतिर्लिंगांपैकी पाचवे ज्योतिर्लिंग असलेल्या परळी येथील प्रभू वैद्यनाथाच्या दर्शनासाठी पहिल्याच श्रावण सोमवारी हरहर महादेवच्या जयघोषात राज्यभरातील भाविकांनी पहाटेपासूनच गर्दी केली होती. दिवसभरात दीड लाख भाविकांनी दर्शन घेतले. महाराष्ट्रासह आंध्र प्रदेश, तेलंगण, कर्नाटक, गुजरात राज्यांतून भाविकांनी हजेरी लावली होती. परळी येथील प्रभू वैद्यनाथाच्या दर्शनासाठी सोमवार, १ ऑगस्ट रोजी मध्यरात्रीपासूनच भाविकांनी मंदिर परिसरात दर्शनासाठी रांगा लावल्या होत्या.

औंढा नागनाथ व घृष्णेश्वर येथेही गर्दी : हिंगोली जिल्ह्यात औंढा नागनाथ व औरंगाबादजवळील घृष्णेश्वर येथेही भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती. दोन्ही ठिकाणी प्रत्येकी सव्वा लाख भाविक दाखल झाले होते.

बातम्या आणखी आहेत...