आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तालुकास्तरावर परिक्षा पार:जिल्ह्यातील दीड हजार विद्यार्थ्यांनी‎ दिली इस्त्रोची तालुका निवड चाचणी‎

बीड‎20 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

इस्त्रो संस्थेला भेट देण्यासाठी विद्यार्थ्यांची निवड‎ करण्यात येणार असून यासाठी शुक्रवारी‎ तालुकास्तरावर परिक्षा पार पडली. केंद्र स्तरावरुन‎ निवडलेल्या १ हजार ५८२ विद्यार्थ्यांनी ही परिक्षा‎ दिली. आता १० मार्च रोजी जिल्हास्तरावर परिक्षा‎ होणार आहे.‎ जिल्हा परिषदेच्या शाळांमधील विद्यार्थ्यांमध्ये‎ वैज्ञानिक दृष्टीकोन निर्माण व्हावा, संशोधन‎ वृत्तीचा विकास व्हावा,शास्त्रज्ञांच ्या‎ कार्यपद्धतीची ओळख व्हावी यासाठी जिल्हा‎ परिषद शाळांमधील विद्यार्थ्यांना इस्त्रो या संशोधन‎ संस्थेची अभ्यास सहल घडवली जाणार आहे.‎

याचा सर्व खर्च प्रशासन करणार आहे. इयत्ता‎ पाचवी ते आठवी पर्यंतच्या प्रत्येक तालुक्यातील ३‎ या प्रमाणे एकूण ३३ विद्यार्थ्यांना सहल घडवली‎ जाणार आहे. पालकमंत्री अतुल सावे, विभागीय‎ आयुक्त सुनिल केंद्रेकर, जिल्हाधिकारी दीपा‎ मुधोळ,सीइओ अजित पवार यांच्या‎ मार्गदर्शनाखाली अतिरिक्त मुख्य कार्यकारी‎ अधिकारी वासुदेव सोळंके यांच्या नेतृत्वात‎ प्राथमिक विभागाचे शिक्षणाधिकारी श्रीकांत‎ कुलकर्णी हे यासाठी नियोजन करत आहेत.‎ यासाठी सुरुवातीला २७ फेब्रुवारी रोजी केंद्र‎ स्तरावर परिक्षा घेतली गेली होती.‎

बातम्या आणखी आहेत...