आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराशहरातील नाथ रोडवर असलेल्या एका तरूणाकडे एक गावठी पिस्तुल आणि दोन जिवंत काडतुस सापडली आहेत. पोलिसांनी सापळा रचुन सदरील तरूणाला अटक केली आहे. गुरूवार १७ जुन २०२१ रोजी दुपारी तीन वाजता शहरातील नाथ टॉकिजसमोर एक तरूण थांबला होता. त्यांच्याकडे गावठी पिस्टल असल्याची माहिती पोलिसांना मिळताच त्याला अटक करून त्याची चौकशी केली. त्याचे नाव अशोक मधुकर मुंडे (वय 34 रा. पांगरी )असल्याचे समोर आले. पोलिसांनी त्याची अंगझडती घेतली असता त्याच्या कमरेला आतुन ठेवलेला एक गावठी पिस्टल मॅगझीन व दोन जिंवत काडतुस आढळुन आले.
त्याच्याकडे पिस्टलचे लायसन्स नसल्याचे उघडकीस आले आहे. या प्रकरणी तुकाराम मुरकुटे यांच्या तक्रारीवरून परळी शहर पोलिस ठाण्यात त्याच्या विरूध्द भारतीय हत्यार कायदयाप्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. ही कार्यवाही परळी शहरचे पोलिस निरिक्षक हेमंत कदम यांच्या मार्गदर्शनाखाली डी .बी. पथकाचे भास्कर केंद्रे, शंकर बुड्डे, तुकाराम मुरकुटे, सचिन सानप यांनी केली. तपास पोलीस जमादार दिगांबर चट्टे हे करत आहेत.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.