आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मारहाण:सेवा सोसायटीच्या मतदानावरून कन्नापूरमध्ये एकाला मारहाण; सिरसाळा ठाण्यात चौघांविरोधात गुन्हा

बीड10 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

गावातील सेवा सहकारी सोसायटीच्या निवडणूकीत आमच्याच पॅनलला मतदान करा म्हणत एकाला बेदम मारहाण करण्यात आल्याची घटना धारूर तालुक्यातील कन्नापूरमध्ये घडली. याप्रकरणी सिरसाळा पोलिस ठाण्यात चार जणांविरोधात गुन्हा नोंद करण्यात आला.

अशोक बन्सी देशमुख असे मारहाण झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. कन्नापूर येथील सेवा सहकारी सोसायटीची निवडणूक सुरु असताना संजय एकनाथ देशमुख, सुुमित संजय देशमुख, सतीश लक्ष्मण देशमुख, सुशील लक्ष्मण देशमुख यांनी अशोक यांना तुम्ही आमच्याच पॅनलला मतदान करा असा आग्रह केला. यावर मी स्वखुशीने कुणालाही मतदान करेल असे अशोक यांनी सांगितले. राग आल्याने चौघांनी अशोक यांना घरात घुसून बेदम मारहाण केली. याप्रकरणी चौघांविरोधात सिरसाळा पोलिस ठाण्यात चौघांविरोधात गुन्हा नोंद केला आहे.

बातम्या आणखी आहेत...