आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वीजपुरवठा खंडित:बीड पालिकेचा एक दिवस वीजपुरवठा बंद

बीड13 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

महावितरणचे बीड नगरपालिकेकडे कार्यालयीन इमारतीचे २ लाख ४६ हजारांची मागील वीज बिल थकबाकी हाेती. शुक्रवारी सायंकाळी महावितरणने पालिकेचा वीजपुरवठा खंडित केला. सोमवारी पालिकेने २ लाख ४६ हजार रुपये बिल जमा केले. मात्र, रिकनेक्शन चार्जेसअभावी १ दिवस विद्युत पुरवठा बंद राहिला. मंगळवारी चार्जेसचे साडेतीन हजार रुपये जमा करताच दुपारपासून विद्युत पुरवठा अखेर सुरू झाला.

सोमवारी मुख्याधिकारी उमेश ढाकणेंनी वीज बिलापाेटी २ लाख ४६ हजार रुपये थकबाकी जमा केली. मात्र, दिवसभर लाइट सुरू झाली नसल्याने अधिकाऱ्यांशी विचारणा केली. त्यानुसार संबंधितांनी रिकनेक्शनचे चार्जेस जमा करण्याचे सूचवले होते.

बातम्या आणखी आहेत...