आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सक्तमजुरी:बसचालकाला मारहाण केल्याने एका जणास; 6 महिन्यांची सक्तमजुरी

बीड14 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

एसटी चालकाला मारहाण केल्याप्रकरणी दाखल गुन्ह्यात एकाला बीड सत्र न्यायालयाचे प्रमुख जिल्हा व सत्र न्या. हेमंत महाजन यांनी सहा महिने सक्तमजुरी व १ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली.

बीड आगारातील एसटी चालक सुधाकर सावंत हे २७ जानेवारी २०१७ रोजी बीड आगारातून बस बीड-वांगी मार्गे इमामपूर येथे घेऊन जात असताना आरोपी हिरामण प्रल्हाद चव्हाण (रा. इमामपूर) याने किरकोळ कारणावरून चालक सावंत यांना मारहाण केली होती. याप्रकरणी सावंत यांनी बीड ग्रामीण पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून हिरामण चव्हाणविरोधात मारहाण व शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा नोंद केला होता.

याप्रकरणी तपास करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते. या प्रकरणाची सुनावणी प्रमुख जिल्हा व सत्र न्या. हेमंत महाजन यांच्यासमोर झाली. सरकारी पक्षाच्या वतीने सहायक सरकारी वकील अमित हसेगावकर यांनी बाजू मांडली. सरकारी पक्षाने एकूण ४ साक्षीदार तपासले. यात तक्रारदार, तपासी अंमलदार व पंच यांच्या साक्षी महत्त्वपूर्ण ठरल्या. न्या. महाजन यांनी दोन्ही बाजूंचे युक्तिवाद एेकून याप्रकरणी हिरामण चव्हाणला दोषी ठरवून सहा महिन्यांचा सश्रम कारावास व एक हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली.

बातम्या आणखी आहेत...