आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
रायमोह ते शिरूर रस्त्यावर रविवारी (ता.१४) रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास टाटा सूमो आणि स्विफ्टचा अपघात झाला. या अपघातात एक जण जागीच ठार झाला असून तीन जण जखमी झाले आहेत.
रायमोह ते शिरूर रस्त्यावर तागडगाव फाट्याजवळ आज रात्री ८.३० दरम्यान टाटा सूमो आणि स्विफ्टची धड़क होऊन जबर अपघात झाला. या अपघातात लोणी येथील शाळेवर कार्यरत असणारे मात्र, सध्या बीड येथील प्रगती विद्यालयात डेपोटेशनवर असणारे प्रशांत डी.कुलकर्णी हे शिक्षक जागीच ठार झाले आहेत. तर तीन जन जबर जखमी झाले आहेत. जखमींची नावे समजली नाहीत.जखमींना शिरूर पोलीस ठाण्याचे जमादार अशोक शेळके यानी घटनास्थळी तात्काळ जाऊन जखमींना बीड येथील रुग्णालयात हलवले आणि पाटोदा पोलिसांना माहिती दिली. मृतदेह शवविच्छेदनासाठी रायमोहा ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आला आहे.
शिक्षक होता मानुरच्या चेक पोस्टवर कार्यरत
या अपघातात ठार झालेले शिक्षक बीड आणि नगरच्या सीमेवर असलेल्या मानुर येथील चेक पोस्टवर कार्यरत होते. ७.३० वाजता आपली ड्यूटी संपल्यानंतर ते आपल्या स्विफ्ट कारणे बीड येथे आपल्या घरी निघाले होते. रस्त्यातच काळाने त्यांच्यावर घाला घातला. चेक पोस्टवरील आजची त्यांची ड्यूटी शेवटची असल्याचे समजते.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.