आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हाणामारीत एकाचा मृत्यू:शेतीच्या वादातून दोन गटांत झालेल्या हाणामारीत एकाचा मृत्यू

परळी2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

शेतीच्या वादातून दोन गटांत झालेल्या हाणामारीत एकाचा मृत्यू झाला असून अन्य दोघे जखमी झाले आहेत.जखमींना अंबाजोगाई येथील स्वाराती रुग्णालयात दाखल करण्यात आला आहे. शेख इलियाज (रा.दारावती तांडा, ता.परळी) असे हाणामारीत मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव असून या प्रकरणी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झालेला नव्हता. परळी पासून जवळच असलेल्या दारावती तांडा शिवारात शेख कुटुंबाची जमीन असून मंगळवारी येथे शेतीच्या वादातून दोन गटात हाणामारी झाली. या हाणामारीत शेख इलियाज या व्यक्तीचा मृत्यू झाला. यातील अरबाज शेख,अब्दुल खागर आणि शेख हसरा हे हाणामारीत जखमी झाले आहेत. त्यांना पुढील उपचारासाठी अंबाजोगाई येथील शासकीय रुग्णालयात दाखल केले.

बातम्या आणखी आहेत...