आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मारहाण:भाट आंतरवाली येथे एकाला बेदम मारहाण; पाच जणांवर गुन्हा

बीड2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

गेवराई तालुक्यातील भाट आंतरवाली येथे किरकोळ कारणावरुन एकाला बेदम मारहाण करुन डोके फोडल्याची घटना घडली. याप्रकरणी रविवारी चकलांबा पोलिस ठाण्यात पाच जणांविरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. अभिमन्यू छबुराव रोकडे (४०) असे मारहाण झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.

त्यांनी चकलांबा पोलिसांत दिलेल्या तक्रारीनुसार, तू आमच्या दुष्मनांना गावात का बोलावतोस असे कारण काढून सुरेश वामन मोरे, मिलिंद सुरेश मोरे, सिद्धार्थ सुरेश माेरे, छबुबाई सुरेश मोरे आणि सविता राहुल रोकडे यांनी त्यांना बेदम मारहाण केले. दगडाने डोक्यात मारुन डोके फोडले. शिविगाळ करुन जीवे मारण्याची धमकीदिली.

बातम्या आणखी आहेत...