आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

डोके फोडले:शेतीच्या वादातून एकाचे डोके फोडले

बीड2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

शेतीच्या वादातून एकाला फोन करुन शेतात बोलावून घेत मारहाण करुन गजाने डोके फोडल्याची घटना शिरूर तालुक्यातील लोणी शिवारात घडली. दादासाहेब भाऊसाहेब बडे (२०) असे मारहाण झालेल्या तरुणाचे नाव आहे.

शुक्रवारी त्याला प्रशांत महादेव हंगे (रा. पाडळी), नंदलाल बबन बडे, केशन किसन बटुळे (रा. लोणी ता. शिरुर) यांनी फोन करुन सर्वे क्रमांक ६८५ मधील शेतात बोलावून घेतले. जुन्या वादाची कुरापत काढून ‘आम्ही घेतलेली जमीन तू आणि आई वडिल वहिती का करता’ असे म्हणून शिविगाळ केली. गजाने डोक्यात मारुन डोके फोडले. बेदम मारहाण करुन जीवे मारण्याची धमकी दिली.

बातम्या आणखी आहेत...