आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राष्ट्रीय महामार्ग:दळणवळण कमी वेळेत प्रवास होणार असल्याने कांदा लवकर दक्षिणेच्या बाजारपेठेत पोहोच; हरितक्षेत्र राष्ट्रीय महामार्ग असा

कडा‎ आष्टी23 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

कडा‎ आष्टी तालुक्यातून जाणाऱ्या‎ सुरत-चेन्नई या हरित क्षेत्र राष्ट्रीय‎ महामार्गामुळे कड्याची कांद्याची‎ बाजारपेठ थेट चेन्नईशी जोडली जाणार‎ आहे.‎ महाराष्ट्रात मुंबई-नागपूर समृद्धी‎ महामार्गानंतर गुजरातमधील सुरत ते‎ तामिळनाडूची राजधानी चेन्नई ही‎ पूर्व-पश्चिम किनाऱ्यावरील शहरे भारत‎ सरकारच्या भारतमाला प्रकल्पांतर्गत‎ हरित क्षेत्र राष्ट्रीय महामार्गाने (ग्रीनफील्ड‎ एक्स्प्रेस हायवे) जोडली जाणार आहेत.‎ महाराष्ट्रातील नाशिक, अहमदनगर,‎ बीड, उस्मानाबाद, सोलापूर या‎ जिल्ह्यांतून हा महामार्ग जात आहे. आष्टी‎ तालुक्यातील १६ गावांतून हा महामार्ग‎ जाणार आहे.

नगर तालुक्यातील‎ चिचोंडी, आठवड गावातून आष्टी‎ तालुक्यातील नांदूर या गावात हा मार्ग‎ प्रवेश करेल, तर बळेवाडी गावातून‎ जामखेड तालुक्यातील डोणगाव,‎ नान्नजमार्गे उस्मानाबाद जिल्ह्यातील‎ भूम, परंडा तालुक्याकडे जाईल. हा‎ द्रुतगती महामार्ग असल्याने आष्टी‎ तालुक्यात फक्त एकाच ठिकाणी त्याचा‎ एन्ट्री, एक्झिट पॉइंट असेल. हा महामार्ग‎ नांदूर, शिरापूर, टाकळी (अमिया),‎ चोभा निमगाव, केळसांगवी, चिखली,‎ वाळुंज आदी १६ गावांतून जाणार आहे.‎ गॅजेटनुसार या मार्गाचा सर्व्हे झाल्याने‎ आता केवळ भूसंपादन करण्याचे काम‎ बाकी आहे.

पाटोदा उपविभागीय‎ अधिकारी यांची या महामार्गाच्या आष्टी‎ तालुक्यातील जमीन संपादनासाठी‎ भूसंपादन अधिकारी म्हणून नियुक्ती‎ केली आहे. नगर तालुक्यात रिंग रोडचे‎ काम सुरू असून त्याचा काही भाग याच‎लवकरच भूसंपादन काम‎ सुरू होईल‎ हरित क्षेत्र महामार्ग जाणार‎ असलेल्या संबंधित गावात त्याची‎ पूर्वसूचना दिली जाईल आणि‎ लवकरच भूसंपादन काम सुरू‎ होईल.‎ - प्रमोद कुदळे, उपविभागीय‎ अधिकारी, पाटोदा तथा भूसंपादन‎ अधिकारी, सुरत-चेन्नई महामार्ग,‎ आष्टी तालुका.‎ काही भाग याच रस्त्याला जोडला जाणार आहे.‎ आष्टी तालुक्यातून मोठ्या प्रमाणात कांदा चेन्नईसह‎ दक्षिण भारतातील शहरांकडे जात असतो. आता‎ नॉनस्टॉप आणि कमी वेळेत प्रवास होणार असल्याने‎ कांदा लवकर दक्षिणेच्या बाजारपेठेत पोहोच होईल.‎ शिवाय या मार्गामुळे अक्कलकोट, गाणगापूरकडे‎ दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांना सरळ आणि सुलभ‎ मार्ग उपलब्ध होईल तर गुजरातमधील सुरतकडे‎ जाण्यासाठीही नेहमीपेक्षा कमी वेळ लागेल.‎‎

बातम्या आणखी आहेत...