आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दव्य मराठी विशेष:जीएसटीसह इन्कम टॅक्स प्रणालीतूनच मिळेल देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकटी : उमेश शर्मा

अंबाजोगाई18 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

जीएसटी व इन्कम टॅक्सच्या प्रणालीच्या माध्यमातूनच देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकटी मिळते. प्रत्येकाने वेळेत टॅक्सचा भरणा केला तर आपला पैसा राष्ट्राच्या मदतीला कामी येतो. यासाठी कोणताही टॅक्स वेळेत भरला पाहिजे, असे प्रतिपादन औरंगाबाद येथील सी.ए.तथा सेंट्रल कौन्सिल मेंबर उमेश शर्मा यांनी केले. या कार्यशाळेस अंबाजोगाई, केज, धारूर, परळी व परिसरातून ७४० प्रतिनिधी उपस्थित होते.

अंबाजोगाई टॅक्स प्रॅक्टिशनर्स असोसिएशन व रोटरी क्लब अंबाजोगाई सिटी यांच्या विद्यमाने ‘इन्कम टॅक्स व जीएसटी’ विषयावर रविवारी मानवलोकच्या सभागृहात एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन केले होते. कार्यशाळेच्या उद्घाटनप्रसंगी शर्मा बोलत होते. अध्यक्षस्थानी ‘मानवलोक’चे कार्यवाह अनिकेत लोहिया होते. तर व्यासपीठावर सीए डॉ. रवींद्र खैरनार, शुभम राठी, जी. जी. रांदड, लक्ष्मीकांत सोनी, उद्योजक प्रताप पवार, व्ही. बी. वालवडकर, पी. जी. रांदड, एस. एल. बजाज, रोटरीचे अध्यक्ष विवेक गंगणे, सचिव प्रा. रोहिणी पाठक, प्रकल्प संचालक पुरुषोत्तम रांदड, सहसंचालक सचिन बेंबडे यांची उपस्थिती होती. अनिकेत लोहिया म्हणाले की, ग्रामीण भागातील सामाजिक संस्थांना कर प्रणालीचा होणारा त्रास व वाढते संभ्रम दूर करण्यासाठी पुढाकार घेण्याची विनंती उमेश शर्मांकडे केले. या वेळी उद्योजक प्रताप पवार, व्ही. बी. वालवडकर, पुरूषोत्तम रांदड, लक्ष्मीकांत सोनी, रवींद्र खैरनार यांनीही मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविक पुरूषोत्तम रांदड यांनी केले. सूत्रसंचालन अमित रांदड, तर आभार प्रा. रोहिणी पाठक यांनी मानले.

व्यवहार कागदोपत्री परिपूर्ण असायला हवा
जीएसटी व इन्कम टॅक्समध्ये वेळोवेळी होणारे बदल समजून घेतले पाहिजे. प्रशिक्षणाच्या माध्यमातून बारकावे समजून घेतले पाहिजे. कर चुकवण्याच्या भानगडीत न पडता आपला व्यवहार सुरळीत व कागदोपत्री परिपूर्ण असला पाहिजे, असे उमेश शर्मा यांनी सांगितले.

बातम्या आणखी आहेत...